विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेत तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी घेतला आहे .राज्याच्या महापालिकांमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच वेगळा आणि स्तुत्य निर्णय आहे Aurangabad: Another unprecedented decision of Kisan Collector Astik Kumar Pandey! Will give jobs to third genders in the corporation
महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये प्रथमच तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना नोकरी देण्याच्या ह्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे . औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
“तृतीयपंथी घटक नेहमीच समाजात उपेक्षित राहिला आहे. आजही समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेतले जाणार आहे” असे आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.
सुशिक्षित असूनही बेरोजगार
औरंगाबाद शहरात तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींची संख्या पाचशेपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक जण सुशिक्षित आहेत, परंतु समाजाच्या दृष्टीकोनामुळे त्यांच्यावर रस्त्यावर फिरुन पैसे मागण्याची वेळ येते. शैक्षणिक कुवत असूनही दारोदार पैसे मागून कुटुंब चालवण्याची आणि उदरनिर्वाह करणे हे दुर्दैवी आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत तृतीयपंथी समुदायातील सदस्यांची पात्रता, कौशल्य, त्यांच्या संभाव्य भूमिकांवर चर्चा झाली. समाजातील सदस्यांमध्ये जागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड आणि आस्तिक कुमार पांडेय पुढील आठवड्यात तृतीयपंथियांशी भेट घेणार आहेत.
बदलत्या काळासोबत समाजही बदलताना दिसतो आहे. तृतीयपंथी समाजातही अनेक लोक शिक्षित, उच्चशिक्षीत होत आहेत. त्यामुळे असे तृतीयपंथी तरुण मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या शोधात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App