दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे मनोबल तोडण्याचा डाव
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिेसेस इंटेलिजन्स (आयएसआय) खलिस्तानी आंदोलनाला काश्मीरमधील दहशतवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत असे दिल्लीत पकडण्यात आलेल्या पाच अतिरेक्यांवरून उघड झाले आहे. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये एकाचा पंजाबचे शौर्य चक्र विजेते बलविंदर सिंह यांच्या हत्येत सहभाग होता, असे दिल्ली पोलीसांच्या विशेष पथकाचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले. five terrorists arrested in delhi
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शकरपूर येथे ५ संशयित दहशतवाद्यांना पकडले आहे. यांमध्ये पंजाबचे दोन, तर काश्मीरचे तीन दहशतवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूल, दोन किलो हिरोइन आणि एक लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. गँगस्टर्सचा वापर नियोजित हत्यांसाठी केला जात असल्याची माहिती कुशवाहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मुळे जातीय-धार्मिक तणाव निर्माण होतो आणि दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे मनोबल तोडण्याचा डाव होता.
ऑक्टोबरमध्ये बलविंदर सिंह यांच्या हत्येत गुरुजीतसिंह भूरा आणि सुखदीप यांचा सहभाग होता. यांचा आखातात असलेल्या कोण्या सुखमीत आणि इतर गँगस्टर्सशी संबंध होता. या गँगस्टर्सचे आयएसआयशी संबंध असल्याचेही स्पष्ट होत आहे. आज पोलिसांनी जी हत्यारे जप्त केली त्याच हत्यारांनीच हत्या केल्याचा दावा पोलीसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या तीन काश्मिरींचे हिजबुल मुजाहिद्दीनचे ओव्हरग्राउंड वर्कर्स आहेत. यांच्यासाठी पाकिस्तानात सेटअप होता. तसेच त्यांचे साथीदार पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. काश्मीर आणि खलिस्तान आंदोलनाचा एकत्र करण्याचा पाकिस्तानच्या आयएसआयचा प्रयत्न आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App