राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा मंत्रीमंडळाच्या बैठकीलाच चार मंत्र्यांनी दांडी मारल्याने ममता बॅनर्जी चांगल्याच धास्तावल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : राज्यातील दहा आमदारांसह ४७ नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला होता. त्यातच आज पुन्हा मंत्रीमंडळाच्या बैठकीलाच चार मंत्र्यांनी दांडी मारल्याने ममता बॅनर्जी चांगल्याच धास्तावल्या आहेत. Another blow to Mamata, four ministers stormed the meeting
10 आमदारांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडल्यामुळे ममता अडचणीत आल्या आहेत. त्यानंतर आता ममता यांनी बोलावलेल्या बैठकीला पुन्हा चार मंत्री गैरहजर राहिल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची राज्य सचिवालय कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या गेल्या. मात्र, यावेळी राजीव बँनर्जी, गौतम देव, रवींद्रनाथ घोष आणि चंद्रनाथ सिन्हा या चार महत्त्वाच्या मंत्र्यांनी बैठकीला दांडी मारली. बैठकीला ते अनुपस्थित असल्यामुळे पश्चिम बंगलाच्या राजकारणात पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आले.
दरम्यान, बैठकीला चार मंत्री उपस्थित नसल्यामुळे राजकीय गोटात अनेक चर्चा सुरु झाल्या. त्याबद्दल सांगताना, पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनी सर्व दावे फेटाळून लावत, अनुपस्थित मंत्री हे त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हजर राहू शकले नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व मंत्र्यांनी बैठकीला येऊ शकणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांना कळवलं असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मात्र, भाजपमध्ये नुकतेच झालेले इनकमिंग पाहता चटर्जी यांच्या दाव्यावर शंका उपस्थित केली जात आहे. या आधीही ममता यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजीव बॅनर्जी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहिलेले आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. पार्थ चटर्जी आणि प्रशांत किशोर यांनी राजीव बॅनर्जी यांच्यासोबत यापूर्वी बैठक घेतली होती. या बैठकीत बॅनर्जी यांची नाराजी मिटली नव्हती. त्यानंतर आता राजीव बॅनर्जी पुन्हा ममता यांनी बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या याच अनुपस्थितीमुळे बंगालमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.
नुकतेच भाजपवासी झालेले शुभेंदु अधिकारी यांनीदेखील ते भाजप प्रवेश करणार असल्याचे कुणालाही कळू दिले नव्हते. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App