विशेष प्रतिनिधी
पुणे : अभिनेत्री अंकिता लोखंडे पती विकी जैनबरोबर बिग बॉस १७ मध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये दोघांची अनेकदा भांडणं होताना दिसतात. अंकिता या शोमध्ये तिचा दिवंगत एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना दिसली. तिने सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली होती, याबाबत खुलासा केला आहे. Ankita Lokhande news
अंकिता नावेदशी बोलताना म्हणाली की सुशांतबरोबर ब्रेकअपनंतरचा काळ हा तिच्यासाठी सर्वात कठीण टप्पा होता आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला अडीच वर्षे लागली. खरं तर, त्या टप्प्यात विकी तिचा जवळचा मित्र होता. ती विकीला नेहमी सांगायची की सुशांत तिच्याजवळ परत येईल आणि ती सुशांतच्या परत येण्याची वाट पाहील. ती सुशांतबरोबर बराच काळ नात्यात होती, त्यामुळे ब्रेकअपनंतर पुढे जाणे तिच्यासाठी खूप कठीण होते.
अंकिता पुढे म्हणाली की सुशांतने मूव्ह ऑन केलं, त्यामुळे आपली तशी अवस्था झाली, मी मूव्ह ऑन करू शकले नव्हते. मी पुढे जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु ते जमलं नाही. मी स्वत: ला दुसर्या कोणाला डेट करण्याची कल्पना करू शकत नव्हती. तो काळ खूप त्रासदायक होता, असं अंकिताने नावेदला सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App