आर्यन खानच्या व्हॉट्स अप चॅटशी अनन्या पांडेचा संबंध?
विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुंबई क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB)टीमने आज (21 ऑक्टोबर) दिवसभर चौकशी केली आहे. अनन्याचं नाव आर्यन खानच्या चॅटमधून समोर आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.Ananya Panday: Ananya Pandey’s phone seized; Who exactly is Ananya Pandey who came up in Drugs Connection
आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर एनसीबी अॅक्शनमोडमध्ये आली. एनसीबीचे पथक अभिनेता शाहरुख खानच्या घरी पोहोचले. दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. अनन्या पांडेला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.
आर्यन खान वापरत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू एनसीबीकडे जमा करायला सांगून एनसीबीचं पथक तपासानंतर माघारी फिरलं.
आर्यन खानच्या व्हॉट्स चॅटशी अनन्या पांडेचा संबंध असल्याची चर्चा असून, त्यामुळेच एनसीबीच्या पथकाने तिच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली .
एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं, तिला दुपारी २ वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं . दरम्यान, एनसीबीने अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनसीबीकडून समन्स मिळाल्यानंतर वडील चंकी पांडे यांच्यासह अनन्या पांडे ही आपला जबाब नोंदविण्यासाठी एनसीबी कार्यालयात गेली होती. जिथे अनेक तास तिचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र, अनन्याची चौकशी आज (21 ऑक्टोबर) पूर्ण होऊ न शकल्याने तिला उद्या (22 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
अनन्या एनसीबी कार्यालयात पोहोचल्यानंतर एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेची चौकशी केली. समीर वानखेडे यांच्यासह तपास अधिकारी व्ही.व्ही. सिंहही उपस्थित होते. तसेच एक महिला अधिकारीही चौकशी दरम्यान तेथे उपस्थित होती.
अनन्या कोण आहे?
अनन्या पांडे बॉलिवूडच्या प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जाणून घेऊयात अनन्या नेमकी कोण आहे आणि ती नेमकी काय करते.
22 वर्षीय अनन्या पांडे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई इंटरनॅशनल अंबानी स्कूलमधून पूर्ण केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App