मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते, शिवसेनावाले कशावरही बोलतात, अमृता फडणवीस यांचा टोला

मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, असं मला वाटतं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगावला.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मी योग्य मुद्दा सापडल्यावर बोलते आणि ते (शिवसेनेमधील) लोकं कशावरही बोलतात. ते नको व्हायला. बाकी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि संविधानाने दिलेल्या हक्कानुसार बोलणं गरजेचं आहे, असं मला वाटतं, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लगावला.

Amruta Fadnavis Shiv Sena latest news

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, राजकारणात नसतानाही एवढं ट्रोलिंग होते. मला जे बोलायचंय ते मी बोलते. राजकारणात जाईन तर कशी हालत होईल माझी. मला वाटतं मी सरळ बोलते. मला कोणाची भीती नाहीय. मी माझ्या हिशोबानेच काम करु शकते. त्यामुळे मी राजकारणासाठी अनफिट आहे.

अनेकदा तुमच्यावर शिवसेनेच्या नेत्यांकडून टीका होते. शिवसेनेला शवसेना म्हणणं असो किंवा आदित्य ठाकरेंबरोबर रंगलेलं ट्विटवॉर असो किंवा प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत रंगलेलं ट्विटवॉर असो. एका मित्र असलेल्या पक्षाबरोबर आता जे बदलेलं नातं आहे त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, खूप वेळा असं होतं की नाती बदलतात. अशावेळी आपण ज्या कुरुक्षेत्रात आहोत, ज्या बाजूने आहोत त्या बाजूने आपण बोलतो. तिथे आपली बाजू मांडण्यासाठी आहे, काहीतरी बोलण्यासारखा विषय आहे असं वाटल्यास मी ही बोलते. साहाजिकपणे आता आम्ही (भाजपा आणि शिवसेना) एकमेकांच्या विरोधात आहोत तर ते ही माझी काही स्तुती नाही करणार. त्यामुळे मला जेव्हा काही व्हॅलीड मुद्दे मिळाले की मी ही त्यावर बोलणार.भारतीय जनता पार्टी हा एक राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. यामध्ये बायको जी स्वत: राजकारणामध्ये नाही. ती थेट सल्ला देत नाही. देवेंद्रजींचे दिग्गज असे वरिष्ठ नेते त्यांना सल्ला देऊ शकतात. देवेंद्रजी स्वत: या क्षेत्रामध्ये अत्यंत निपूण आहेत. अत्यंत व्यवस्थित चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पक्षाचे ते सदस्या आहेत. मी त्यांची पत्नी असले तरी माझं क्षेत्र पूर्ण वेगळं आहे. त्यामुळं आम्ही एकमेकांच्या क्षेत्रात ढवळाडल करत नाहीत. तसेच माझे जे निर्णय असतात ते मी घेते. त्यात देवेंद्रजीही मला सल्ला देत नाहीत, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Amruta Fadnavis Shiv Sena latest news

अमृताजींचे ट्विट हे त्यांचेच विचार असतात का? की त्यांना कोणी तरी सांगतं असे ट्विट करायला या प्रश्नावर त्या म्हणाल्या, तुम्हाला मी अशी महिला वाटते का जिला पतीने सांगावं की असं जाऊन बोलं आणि मी बोलेन? मी जन्मात तसं नाही बोलणार. जे मला वाटतं तेच मी दरवेळेस बोलते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*