विशेष प्रतिनिधी
पुणे : अमृता खानविलकर मराठी चित्रपट विश्वातील सध्याची आघाडीची अभिनेत्री. गोलमाल’ या चित्रपटातून अमृता खानविलकरने २००६ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अमृता ही कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणून ओळखली जाते. तिने अलीकडेच तिचं युट्यूब चॅनेल सुरू केलं आहे.Amrita Khanvilkar news
यावरील व्हिडीओच्या माध्यमातून अमृताच्या नृत्यकलेची व भटकंतीची झलक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळते. सतत चर्चेत राहणारी, सर्वांशी हसतमुखाने संवाद साधणारी अमृता खऱ्या आयुष्यात फारशी बोलत नाही. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे.
अमृता खानविलकरने नुकतीच व्हायफळ नावाच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा देत ती मुंबईहून पुण्याला कशी गेली?, बालपणातील गावच्या आठवणी आणि एकंदर तिचा स्वभाव याविषयी भाष्य केलं आहे. अमृता म्हणाली, “लहानपणापासून मी खूप माझ्या-माझ्यातच राहायचे. आजही मी एवढी वर्ष इंडस्ट्रीत काम करून माझी फक्त एकच खास मैत्रीण आहे. ती एकच मैत्रीण माझ्यासाठी खूप आहे.”
अमृता पुढे म्हणाली, “गेल्या दहा वर्षांपासून सोना (सोनाली खरे) माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिच्या व्यतिरिक्त माझ्या फक्त ३-४ मैत्रिणी झाल्या असतील. मी खूप जास्त अंतर्मुख (Introvert) आहे. लहानपणापासूनच मी बाहेर खूप शांत असायचे…माझी दंगा-मस्ती या सगळ्या गोष्टी फक्त घरी चालायच्या.”
दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच अभिनेत्री ‘कलावती’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये आणि ‘पठ्ठे बाबूराव’ चित्रपटात अमृता प्रमुख भूमिकेत दिसेल. हे चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App