विशेष प्रतिनिधी
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे – नंदूरबार मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेलांनी बाजी मारली हे खरेच पण त्यांच्या विजयातून राज्य पातळीवर ठाकरे – पवार – थोरातांनी महाआघाडी केली तरी हे नेते खालच्या पातळीवरील फाटाफुटीच्या फटी बुजवू शकले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. amrish patel wins
वरच्या नेत्यांचे “खुर्ची मिलन” झाले, पण खालच्या पातळीवर लोकप्रतिनिधींचे आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचेच धुळ्यात दिसून आले. या निवडणुकीत ४३७ मतदार होते. त्यापैकी ४३४ मतदारांनी आपला हक्क बजावला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पक्षनिहाय स्थिती अशी होती.
भारतीय जनता पक्ष – १९९, महाविकास आघाडी – राष्ट्रीय काँग्रेस – १५७, राष्ट्रवादी काँग्रेस – ३६, शिवसेना – २०, एकूण – २१३.
अन्य – एएमआयएम – ९, समाजवादी पार्टी – ७, मनसे – १, बसपा – १, अपक्ष – ७, एकूण – २५.
भाजपच्या अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाली आहेत म्हणजे भाजपच्या एकूण मतांपेक्षा १३३ मते अधिक मिळाली आहेत
महाविकास आघाडीच्या उमेदवारास ९८ मते मिळाली आहेत. म्हणजे त्यांच्या तीन पक्षाच्या एकूण संख्येच्या ११५ मते कमी मिळाली आहेत. म्हणजे अन्य पक्षांची सगळी मते तर अमरीश पटेल यांनी घेतलीच पण महाविकास आघाडीची ११५ मते देखील फुटली आहेत. वरती मुंबईत नेत्यांचे “खुर्ची मिलन” झाले तरी खाली लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांचे मनोमिलन झाले नसल्याचेच यातून स्पष्ट होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App