केंद्रातल्या मोदी सरकारने घेतलेल्या देशातल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात महाराष्ट्रातले कथित “सहकार महर्षी” – “कृषी महर्षी” व्यासपीठावर दिसले नाहीत…!! त्यांना निमंत्रण न देऊन केंद्राने महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीत शिरलेले तोकडेपण दाखवून दिले आहे काय…??
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम मध्ये आज झालेल्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मोदी सरकारच्या सहकार विषयक धोरणाचा “आगाज” केला, पण त्यावेळी त्यांनी सहकार चळवळीच्या यशस्वीतेचे वर्णन करताना फक्त अमूल आणि लिज्जत पापड या दोन चळवळींची का उदाहरणे दिली? बाकीची उदाहरणे अमित शहा यांच्या डोळ्यापुढे नव्हती का? महाराष्ट्रात सहकार चळवळ एवढी जोरात असताना तिथल्या एखाद्या सहकारी साखर कारखान्याचे अथवा सहकारी संस्थेचे उदाहरण त्यांनी आदर्श सहकार चळवळ म्हणून का दिले नाही?Amit Shah give examples of Amul, Lijjat Papad? Why not give examples of co-operative sugar factories in Maharashtra .
वास्तविक पाहता अमित शहा यांनी सहकार चळवळीतील या अमूल्य योगदानाविषयी ज्या महान व्यक्तींची नावे घेतली त्यामध्ये मराठी व्यक्ती सर्वाधिक आहेत. माधवराव गोडबोले, विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, लक्ष्मणराव इनामदार यांची नावे त्यांनी अग्रक्रमाने घेतली. त्याच वेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रेरणेतून काम करणाऱ्या त्रिभुवनदास पटेल, वैकुंठभाई मेहता यांचीही नावे घेतली.
परंतु त्यांनी उदाहरणे देताना महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांचा उल्लेख का केला नाही? हे साखर कारखाने विठ्ठलराव विखे पाटलांनी आणि धनंजयराव गाडगीळ यांनी ज्या प्रेरणेतून सुरू केले ती प्रेरणा आता महाराष्ट्रात उरली नाहीये काय? असे अमित शहांना वाटले काय? म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतल्या दिग्गजांची नावे तर घेतली पण महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांचा उल्लेख “समस्या” या स्वरूपात केला…!! आणि नेमकी इथेच अमित शहा यांच्या भाषणातली खरी “मेख” आहे…!!
अमूल किंवा लिज्जत पापड या केवळ गुजरातमधल्या चळवळी आहेत म्हणून त्यांनी उल्लेख केला नाही, तर त्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाल्या म्हणून उल्लेख केला, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या सहकारी साखर कारखान्याचा त्यांनी सहकार चळवळीचे यशस्वी उदाहरण म्हणून उल्लेख केला नाही याचा अर्थच महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्यांचा व्यावसायिक दृष्टीने सहकार क्षेत्रातील तथाकथित महर्षी किंवा दिग्गज यांनी कधी विचारच केला नाही, हेच अमित शहा यांनी एक प्रकारे दाखवून दिले आहे.
The Govt will start a new Cooperative policy while celebrating Azadi Ka Amrit Mahotsav which will also boost the rural society of India…Today, about 91% of the villages in the country are having small or big cooperative institutions work: Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/E0xwkIGud0 — ANI (@ANI) September 25, 2021
The Govt will start a new Cooperative policy while celebrating Azadi Ka Amrit Mahotsav which will also boost the rural society of India…Today, about 91% of the villages in the country are having small or big cooperative institutions work: Union Home Minister Amit Shah pic.twitter.com/E0xwkIGud0
— ANI (@ANI) September 25, 2021
त्यांनी फक्त सहकार चळवळीतील दिग्गजांच्या नावांचा उल्लेख केला, हे एक प्रकारे स्वतःला सहकार महर्षी म्हणवून घेणाऱ्या आजच्या नेत्यांना लांछन आणणारी बाब आहे. इतकेच नाही तर स्वतःच्या केंद्रीय कृषिमंत्रिपदाचा डंका वाजवणाऱ्यांनाही त्यांनी कृषी खात्याचे 2009 – 10 चे बजेट फक्त 12 हजार कोटी रुपयांचे होते हे सुनावून त्यांचा नेमका “राष्ट्रीय दर्जा” काय होता हे दाखवून दिले आहे…!!
एकीकडे सहकारी बँकांच्या चौकशा टाळण्यासाठी अमित शहा यांच्या दारात जाणाऱ्यांना ही चपराक तर आहेच, पण “सहकार महर्षी” “दिग्गज कृषी महर्षी” अशा स्वतःला उपाध्या लावून घेणाऱ्यांना देखील अमूल काय किंवा लिज्जत पापड काय यांचे उल्लेख खऱ्या अर्थाने टोचणी देणारी आहेत…!!
अमूल आणि लिज्जत पापड हे थोडक्यात सुरू होऊन मोठ्या झेप घेऊ शकतात. पण इथली सहकार चळवळ, इथले सहकारी साखर कारखाने तशी झेप का घेऊ शकले नाहीत? याचा जाब मात्र महाराष्ट्राच्या जनतेने विचारला पाहिजे. देशाच्या पातळीवर सहकार चळवळ यशस्वी होऊ शकते. सहकार चळवळीने आपली व्याप्ती वाढवली तर तिच्यात विविध आयाम जोडले जाऊ शकतात. अतिसामान्यातल्या सामान्यपासून ते मोठ्या भांडवलदारापर्यंत सहकार चळवळीतून पतपुरवठा करता येऊ शकतो एवढा विशाल विचार अमित शहा यांच्या आजच्या भाषणात होता.
पण महाराष्ट्रातल्या स्वतःला सहकार चळवळीतले दिग्गज म्हणून घेणार्यांना एवढा विशाल विचार का करता आला नाही? एवढा मोठा विचार का मांडता आला नाही? कृषी मंत्रालयाचे फक्त 12 हजारांचे बजेट घेऊनच ते का समाधानी का राहिले? हे प्रश्न विचारण्याची गरज आहे.
सहकार हा विषय राज्यांच्या यादीतला आहे हे उघड आहे. पण मग राज्य सरकारने तरी सहकार या विषयांमध्ये किती मोठा तीर मारला आहे? हे सांगण्याची जबाबदारी कोणाची?, या विषयावर देखील मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात मंथन होण्याची गरज आहे. नुसतेच स्वतःला “कृषी महर्षी”, “सहकार महर्षी” असे म्हणवून घेतल्याने कोणी दिग्गज होत नाही फार तर मराठी माध्यमांमध्ये ढोल वाजवून घेता येऊ शकतात. पण राष्ट्रीय पातळीवर त्यांची मोहर कधीच उमटणार नाही किंबहुना ती कधीच उमटली नाही हेच आजच्या अमित शहा यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App