अमरावती :२३ वयोगटापर्यंतच्या अनाथ मुलांना अनाथलयात राहता येणार ; महिला आणि बालकल्याण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय 


  • कोरोना कालावधीत माता-पिता बळी पडल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठीचे प्रयत्न गतिमान करावेत, यासाठी अशा संकटग्रस्त बालकांपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा प्रभावी करण्यात आलीय. कोविडमध्ये माता-पिता गमावलेली मुले ही बाल कामगार, बेकायदेशीर दत्तक किंवा मानवी तस्करीस बळी पडू शकतात. Amrawati : Orphans up to the age of 23 can live in orphanages: Important decision of Women and Child Welfare Department

विशेष प्रतिनिधी

अमरावती: राज्यातील अनाथ मुलांच्या संदर्भात महिला आणि बालकल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता २३ वयोगटापर्यंतच्या अनाथ मुलांना अनाथलयात राहता येणार  आहे. यापूर्वी राज्यातील अनाथ मुलांना य१८ वर्षांनंतर अनाथ आश्रमात राहू दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे या मुलांच्या तारुण्यावरही मोठा परिणाम होत होता. Amarawati:Orphans up to the age of 23 can live in orphanages: Important decision of Women and Child Welfare Department

अनाथलयातील मुलांना वयाच्या २३व्या पर्षांपर्यंत अनाथ आश्रमात राहू द्यावे अशी मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली होती.

त्यानंतर आता राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाने २३ वर्षे पूर्ण होईपर्यंत अनाथ मुला-मुलींना आश्रमात राहता येणार असा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे

तसेच कोविड-19 संसर्गाच्या संकट काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. राज्यात कोविड मुळे १९५  मुले अनाथ झाली आहेत. आई आणि वडील गमावलेली १०८ बालके तर एक पालक गमावलेली ८७ बालके आहेत.

कोविडमुळे अनाथ मुलांची संख्या

एकूण अनाथ मुले – १९५

1१ पालक गमावलेली – ८७ मुले

दोन्ही पालक गमावलेली -१०८

कुठल्या जिल्ह्यात किती अनाथ मुले?

नंदुरबार – ९३

हिंगोली – १८

जालना – १६

ठाणे – ११

Amarawati:Orphans up to the age of 23 can live in orphanages: Important decision of Women and Child Welfare Department

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती