लाईफ स्किल्स : यश मिळवण्यासाठी अहंकाराला नेहमी दूर झिडकारा


जीवनात यश प्रत्येकाला हवे असते. यश मिळवण्यासाठी व्यक्ती शक्य असेल तितके प्रयत्न करत असतो. पण यश प्रत्येकांच्या नशिबी असेल असे नाही. आपल्या जीवनात यश हवे असेल तर आपण काही विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. परंतु अनेकजण आपल्या कार्याविषयी गंभीर नसतो. जीवनातील यशाबद्दल आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीने दररोज चांगले कार्य केले पाहिजे. या कार्यांमध्येच जीवनात यश मिळण्याचा रहस्य आहे. जे लोग दररोज एक चांगले कार्य करण्याचं ठरवतात, आणि ते कार्य करतात अशा लोकांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा असते.Always repel ego for success

हे व्यक्ती आपल्या जीवनातील लक्ष्य सहजतेने आणि लवकर मिळवत असतात. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, चांगले काम केल्याने मनाला शांती मिळत असते. मनाची शांती व्यक्तीला श्रेष्ठ कार्य करण्यास प्रेरित करत असते. जे लोक असे करण्यास असमर्थ असतात ते जीवनात संघर्षाला सामोरे जात असतात. विद्वानांच्या मते, व्यक्तीचे यश हे त्यांच्या चांगल्या आणि वाईट कामांवर अवंलबून असते. परंतु कधी – कधी आपल्या जीवनातील व्यस्तता आणि तणावामुळे चांगल्या आणि वाईट कामांमधील भेद करण्यास हे व्यक्ती असमर्थ ठरत असतात.

जर वेळ असतानाच योग्य दिशा मिळाली तर व्यक्ती मोठ्या नुकसानापासून वाचू शकतो. यामुळे जीवनात यश आणि लक्ष्मी हवी असेल तर पुढील गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक असते. अंहकारापासून दूर रहा. चाणक्य नीती नुसार, व्यक्तिने कधीही अहंकार करायला नको. अहंकार व्यक्तिच्या प्रतिभेला प्रभावित करत असते. अहंकार भ्रमाच्या स्थितिमध्येही वृद्धि करत असते. भ्रमापासून दूर राहणारा व्यक्तिच खरं यश मिळवू शकतो. सहयोगाच्या भावनेतून करा कार्य करा. यश तेव्हाच मिळते जेव्हा व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन चालत असतो.

आपल्या सहकर्मीचा आपल्या मित्रांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक दिवशी आपल्या कामगारांना आणि आपल्या सहकर्मींना प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रोत्साहित केल्याने कर्मचाऱ्यांच्या कामात कुशलता येत असते. अशा काही बाबी केल्यास यशाची चव चाखत येते.

Always repel ego for success

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण