शेतकरीहिताची चिंता असणारे चर्चा करत आहेत, दलालांचे पाठीराखे इटलीत नववर्ष साजरे करताहेत, शोभा करंदलजे यांचा आरोप


शेतकरी हिताची चिंता असणारे भाजपा सरकार ४० हून अधिक शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहे. मात्र, दलालांचे पाठीराखे असणारे इटलीला नवववर्ष साजरे करण्यासाठी निघून गेले आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या खासदार शोभा करंदलजे यांनी केली आहे.  Allegation of Shobha Karandalje

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी हिताची चिंता असणारे भाजपा सरकार ४० हून अधिक शेतकऱ्यांसोबत चर्चा करत आहेत. मात्र, दलालांचे पाठीराखे असणारे इटलीला नवववर्ष साजरे करण्यासाठी निघून गेले आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या खासदार शोभा करंदलजे यांनी केली आहे.  Allegation of Shobha Karandalje

दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारमधील मंत्री सातत्याने चर्चा करत आहेत. आत्तापर्यंत चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषी कायद्यांच्या विरोधात भडकावून कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी इटलीतील मिलान येथे निघून गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर शोभा करंदलजे यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या सरकारला शेतकरी कल्याणाची चिंता आहे. शेतकरी समृध्द व्हावा ही भाजपाची इच्छा आहे. त्यामुळे भाजपा सरकारकडून दिल्लीत ४० पेक्षा जास्त संघटनांशी चर्चा सुरू आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांना भ्रमित करणारे राहुल गांधी आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकाविले. मात्र, आता त्यांना सोडून इटलीला नववर्ष साजरे करण्यासाठी गेले आहेत.

Allegation of Shobha Karandalje

नव्या कृषि कायद्यांवरून राहुल गांधी सातत्याने शेतकऱ्यांना भडकावित आहेत. ट्विटरवर मोदी सरकारविरुध्द आरोप करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विटर पोल सुरु केला आहे. मोदी सरकारने यावर अद्याप चर्चांच्या फेऱ्या वगळता काहीही ठोस भूमिका घेतलेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. स्वत: मात्र परदेश दौऱ्यावर निघून गेले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण