विशेष प्रतिनिधी
लखनौ : निरंकुश सत्ता गेली. अवती – भवतीची सत्तेची छत्रचामरे गेली भल्या भल्यांना राम आठवतो. उत्तर प्रदेशात रामभक्तांवर गोळ्या चालवून शरयूचे पाणी लाल करणाऱ्या मुलायमसिंह यादवांचे चिरंजीव अखिलेश यादव आता अयोध्येत येऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. akhilesh yadav to visit ayodhya for ramlala darshan
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या अखिलेश यादवांनी स्वतःची ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ते म्हणाले, की राम हा समाजवादी पार्टीचा आहे. आम्ही सगळे रामभक्त आहोत. मी कुटुंबीयांसह अयोध्येला जाऊन रामलल्लांचे दर्शन घेऊन पूजा करणार आहे.
अयोध्येच्या रामाने गेल्या ३० वर्षांत हे परिवर्तन घडविले आहे. १९९० च्या कारसेवेच्या वेळी मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री होते. त्यांनी अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार केला होता. लाठ्या चालविल्या होत्या. कोठारी बंधूंसह शेकडो कारसेवक त्यात हुतात्मा झाले होते. कारसेवकांच्या रक्ताने शरयू लाल झाली होती. त्यावेळी मुलायम सिंहांची उत्तर प्रदेशावर निरंकूश सत्ता होती. त्या धुंदीत त्यांनी कारसेवकांचे बळी घेतले.
शरयूतून रक्ताचे लाल पाणी वाहून गेले. शरयूच्या किनाऱ्यावर रामभक्तांनी दिवाळीत लक्ष दीप उजळले. मुलायमसिंहांच्या चिरंजीवांना रामभक्ती भरते आले आणि आता ते कुटुंबीयांसह रामल्लांच्या दर्शनाला येऊन जणू आपले पिता मुलायमसिंह यांच्या हयातीतच त्यांचे पापक्षालन करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App