वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने सोमवारी रात्री चंदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून (ITR) नवीन अपडेटेड आकाश क्षेपणास्त्राची (आकाश-प्राईम) यशस्वी चाचणी केली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) उच्च स्पीड मानव रहित हवाई लक्षाला लक्ष्य करून ही चाचणी घेतली जी क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या पूर्ण केली. ओरिसाच्या चांदीपूर येथून सायंकाळी साडेचार वाजता क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.Akash Prime Missile:DRDO Test Akash Missile New Version Akash Prime
याबाबतची माहिती डीआरडीओने दिली आहे. आकाश प्राईमच्या चाचणीचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.
भारतीय हवाई सेनेकडून या मिसाईलाचा वापर हवाई हल्ल्यांना सामोरे जाण्यासाठी केला जाईल. डीआरडीओने हे मिसाईल तयार केले आहे. ५६० सेंटीमीटर एवढी या मिसाईलची लांबी असून रुंदी ३५ सेमी आहे. तसेच या मिसाईलमध्ये ६० किलो वजनापर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. आकाश मिसाईल पूर्णपणे हाताळण्यायोग्य असून वाहनांच्या चालत्या ताफ्याचे संरक्षण करण्यास देखील सक्षम आहे.
यानिमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय सेना, भारतीय हवाई दल आणि संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सार्वजनिक कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. आकाश प्राईममुळे देशातील सुरक्षा आणखी वाढेल असे राजनाथ सिंह म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App