Air Chief Marshal :अभिनंदन ! नांदेड-महाराष्ट्राचे सुपुत्र व्ही.आर. चौधरी २७वे हवाई दल प्रमुख;स्विकारला पदभार


  • सुमारे 38 वर्षांच्या विशिष्ट कारकीर्दीत त्यांनी भारतीय हवाई दलाची विविध लढाऊ आणि प्रशिक्षक विमाने उडवली आहेत.
  •  त्यांंना मिग -21, मिग -23 एमएफ, मिग -29 आणि सुखोई -30 एमकेआय लढाऊ विमानांमध्ये 3,800 तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया हे आज निवृत्त झाले असून, त्यांच्या जागी महाराष्ट्राचे सुपूत्र व्ही. आर. चौधरी यांनी हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्विकारला आहे. यापुर्वी एअर मार्शल असलेल्या व्ही.आर. चौधरी (VR Chaudhari) यांना देशाचे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वीच घेतला होता. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्विकारला होता.Air Chief Marshal VR Chaudhari takes charge as 27th Air Chief

विवेक राम चौधरी हे यापुर्वी हे भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडचे कमांडर इन चिफ होते. या पदावर असताना त्यांनी कठीण समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील लडाख आणि इतर भागांमध्ये देशाचे संरक्षण करण्याचे काम केले. हवाई दलाच्या लढाऊ विभागामध्ये २९ डिसेंबर १९८२ रोजी एअर मार्शल चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता.

विशेष म्हणजे ते महाराष्ट्रातील नांदेडचे सुपूत्र आहेत. सुमारे तीन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हवाई दलाच्या वेगवेगळ्या विभागांत काम केले आहे. तसेच आपल्या कार्यकाळात त्यांनी मिग-२१, मिग एमएफ आणि सुखोई एमकेआय या ही लढाऊ विमानं उडवत ३,८०० पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव घेतला आहे.

Air Chief Marshal VR Chaudhari takes charge as 27th Air Chief

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय