वृत्तसंस्था
चेन्नई : मलेशिया अभिनेत्रीला धमकावणे, बलात्कार करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी अण्णा द्रमुकचा माजी मंत्री एम. मणीकंदन याला पोलिसांनी अटक केली आहे. AIADMK’s ex-minister accused of rape by Malaysian national Is arrested
एम. मणीकंदन याला चेन्नई येथील पोलिसांनी बंगळूरमध्ये अटक केली आहे. या प्रकरणी तो पोलिसांना तो कित्येक दिवसांपासून हवा होता. आरोप होताच त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. या प्रकरणी त्याने अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण गुन्हा गंभीर असल्यामुळे तो फेटाळला होता. त्यानंतर तो राज्यातून पळून गेला होता. अखेर बंगळूरमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली.
मणीकंदन याने एका मलेशियन अभिनेत्रीला लग्नाचे निमित्ताने आपल्या जाळ्यात ओढले होते. सुमारे पाच वर्षे ते एकत्र राहत होते. या काळात त्याने तिची फसवणूक केली, बलात्कार केला तसेच तीन वेळा गर्भपात घडवून आणला. पत्नीला घटस्फोट देतो, मग तुझ्याशी लग्न करतो,असे तो सांगत होता, अशी तक्रार अभिनेत्रीने दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App