एक एक केळे वाटणाऱ्या आपच्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांनी धक्के मारून बाहेर काढले

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांसाठी पिझ्झा-लंगरपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी दानशुरता दाखवित एक एक केळे वाटायला सुरूवात केली. त्याला शेतकऱ्यांनी धक्के मारून बाहेर काढले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सुरू शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांसाठी पिझ्झा लंगरपासून ते बिर्याणीपर्यंत सगळ्या प्रकारच्या व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांनी दानशुरता दाखवित एक एक केळे वाटायला सुरूवात केली. त्याला शेतकऱ्यांनी धक्के मारून बाहेर काढले.

विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते प्रीति गांधी आणि कॉंग्रेसचे गौरव पांधी या दोघांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की शेतकरी आंदोलनात आपचा एक कार्यकर्ता केळे वाटत आहे. केजरीवाल सरकारने हे दिले आहे, असे तो म्हणत आहे. त्यानंतर चिडलेले शेतकरी त्याला धक्के मारून बाहेर काढत आहेत. एक शेतकरी त्याला विचारतो की एक केळे देऊन तो आमचे मत मागतो आहेस का? येथे येण्याची तुझी हिंमतच कशी झाली.

प्रीति गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, पाहा आपचे कार्यकर्ते आंदोलक शेतकऱ्यांना कसे भिकारी समजत आहेत.
गौरव पांधी यांनी म्हटले अहे की, अरविंद केजरीवाल तुमच्या तुच्छ आणि घाणेरड्या राजकारणाला शेतकऱ्यांनी दिलेली ही थप्पड आहे. या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये घटनास्थळी संताप आहे. परंतु, माध्यमे हे दाखवित नाहीत. कारण केजरीवाल त्यांना जाहिरातीच्या रुपाने लाच देत आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यासाठी त्यांनी एक दिवसाचा उपवास करण्याचे आवाहन जनतेला केले होते. मात्र, याच केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये तीनही कृषि विधेयके मंजूर केली आहेत. या दुटप्पीपणामुळे पंजाबी शेतकऱ्यांना केजरीवाल नकोसे झाले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*