वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम 30% कमी केला आहे, असे केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. देश सध्या कोरोना व्हायरससोबत लढा देत आहे. अशातच शिक्षण विभागासमोर बोर्ड परीक्षा कशा घ्यायच्या असा प्रश्न उभा ठाकला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि बोर्डाच्या परीक्षांवर रमेश पोखरियाल यांनी आज देशातील विद्यार्थ्यांना संबोधित केले. पोखरियाल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती. 30% syllabus reduced for CBS e boards exams
पोखरियाल यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की, सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्दही हटवला आहे. ऑनलाईन पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भारताच्या नव्या शिक्षण पद्धतीची जगभरातून कौतुक केलं जात आहे. 30% syllabus reduced for CBS e boards exams
कोरोना संकटात सीबीएसईसह इतर बोर्डाच्या परीक्षाही कधी होणार, कशा घेतल्या जाणार, जेईई मेन्स आणि नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांचं शेड्यूल कसं असणार, या सर्व प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक शंका आहेत. आतापर्यंत सीबीएसई परीक्षा 2021 ची डेटशीट जारी करण्यात आलेली नाही. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आज विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत सर्व शंकांचं निरसन केलं.
रमेश पोखरियाल म्हणाले : मी सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना आवाहन करतो की, अभ्यासक्रमातील कोणते चॅप्टर्स हटवले आहेत, यासंदर्भात आपल्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती द्या. याबाबत कोणतीही शंका ठेवू नका.
परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येईल.
बोर्डाच्या परीक्षांच्या तयारीसाठी शाळा सुरु करण्यात आल्या तर सुरेक्षेसाठी मास्कचा वापर करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा. सांगितलेल्या सर्व नियमांचे काम करा. नीट परीक्षा यासंदर्भातील सर्वात मोठे उदाहरण आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App