५० तबलिगी मोकाट; सोमय्यांना नजरकैद; ठाकरे सरकारचा उरफाटा न्याय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात मोकाट घुसलेले तब्बल ५० तबलिगी शोधायला उद्धव ठाकरे सरकारच्या पोलिसांना वेळ नाही आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना नजरबंद करायला आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा़यला भरपूर वेळ आणि मनुष्य बळ आहे. अर्थात यात कार्यक्षमतेने आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचा दोष नाही, तर त्यांना त्या कामाला जुंपणाऱ्या ठाकरे सरकारचा हा दोष आहे.
गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घरी नेऊन मारहाण करण्यात आलेल्या अनंत करमुसे यांना भेटायला सोमय्या हे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून जात होते. परंतु, पोलिसांनी त्यांना अडवून त्यांना घरात नजरबंद केले. सोमय्या यांनीच ट्विट करून या प्रकाराचा निषेध नोंदविला. त्या पाठोपाठ प्रदेश भाजपनेही त्याचा निषेध नोंदविला.
इकडे १५० तबलिगी मुंबईत घुसल्याची माहिती राज्य सरकारला मिळाली पण त्यातले ५० जण अजूनही मोकाट फिरताहेत किंवा दडून बसलेत. ते बाहेर यायला तयार नाहीत. त्यांनी २४ तासांच्या आत सरेंडर व्हावे, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुखांना द्यायला लागतोय. यातूनच सरकारची “कार्यक्षमता” दिसते. अनंत करमुसेंना मारणारे आव्हाडी कार्यकर्ते मोकाट, ५० तबलिगी मोकाट आणि नियम पाळणारे किरीट सोमय्या घरात…!! अशी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात