सीएसआरचा कायदा कॉँग्रेस सरकारनेच आणला : देवेंद्र फडणवीस

सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे.  आपण मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणारा निधी सीएसआरमध्ये धरावा, अशी मागणी केली होती असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी
पुणे : सीएसआर फंड हा कायदा काँग्रेस सरकारने तयार केला आहे. काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे.  आपण मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणारा निधी सीएसआरमध्ये धरावा, अशी मागणी केली होती असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएसआर फंडावरून सुरू असलेले राजकारण विरोधकांचे षडयंत्र आहे. कॉँग्रेसनेच हा कायदा केला  आहे. ते म्हणाले, मुंबई सारख्या मोठी लोकवस्ती असलेल्या शहरातील अनेक झोपडपट्टी भागात रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकप्रकारे कम्युनिटी स्प्रेडच्या दारापर्यंत आपण पोहचल्याची भीती आहे. यासाठी लॉकडाऊनमध्ये लोकांपर्यंत अन्यधान्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. यासाठी रेशनमधले घोळ आपल्याला मिटवावे लागतील.
मे मध्ये तीन कोटी लोकांना रेशनचा पुरवठा करण्याचा सरकारने जीआर काढला आहे. मात्र, एप्रिल महिना लोकांनी कसा काढयचा असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. अनेक राज्यांनी हा निर्णय केंद्राकडून येणारा पुरवठा आणि राज्यात असलेला माल याचं रेशन कार्ड आणि रेशन कार्ड नसलेल्या लोकांपर्यंत पोहचवायला सुरुवात केली असल्याचं सांगत राज्यात अशा प्रकारे योजना आपण राबवू, शकतो असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात