विशेष प्रतिनिधी
नागपूर : संपूर्ण देश चीनी व्हायरस विरुध्दची लढाई लढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना आणखी जोमाने यामध्ये उतरण्याचे आवाहन करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत रविवारी मार्गदर्शन करणार आहे.
सध्याची एकूणच स्थिती लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूरच्यावतीने अक्षय तृतीयेच्या पर्वावर ऑनलाईन बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या बौद्धिक वर्गात सरसंघचालक मार्गदर्शन करणार आहेत. हा बौद्धिक वर्ग रविवार, 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता यु ट्युब आणि फेसबुकवर प्रसारित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी ‘वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका’ या विषयावर डॉ. मोहन भागवत भाष्य करणार असून, या वर्गाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले आहे.
चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. संघाचे तीन लाखाहून अधिक कार्यकर्ते सुमारे ३ कोटी लोकांना भोजन पुरवित आहेत. सुमारे ३८ लाख परिवारांना रेशन पुरविण्यात आले आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ही मदत केली जात आहे. प्रामुख्याने दुसर्या राज्यांत अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App