विशेष प्रतिनिधी
नाशिक : शहरी भागात लॉकडाऊनचे नियम थोडे शिथिल केले तर दारूच्या दुकानांवर लोकांनी लगीनघाई करत झुंबड उडविली. सोशल डिस्टंसिंगचा धुव्वा उडविला; तर गावांमध्ये शुभमंगलची सनई देखील शिस्तीत वाजवली गेली. दोन्ही पक्षांनी सोशल डिस्टंसिंग पाळत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेले संचारबंदीचे नियम लक्षात घेता येथील पत्रकार देवलाल पाटील यांच्या कन्येचा विवाह घरातच मोजक्या पाच पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला. या निर्णयाचे शहर व परीसरात कौतुक होत आहे. सध्या कोरोना संचारबंदीमुळे अनेकांनी शुभविवाहाच्या तारीख निश्चित होऊनही विवाह धामधुमित करण्यासाठी पुढील वर्षी करण्याचा निश्चय केला आहे तर काहींनी ठरलेल्या तारखेस विवाह सोहळा करण्याचा निर्णय मोजक्याच वधू-वर पित्यांनी घेतला आहे. वधू-वर पक्षाकडील मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितील सोशल डिस्टन्स पाळून विवाह सोहळा घरातल्या घरात पार पडत आहेत. मुंजलवाडी (ता.रावेर) येथील रहिवासी व सध्या रावेर येथे स्थायिक असलेले दैनिक तरुण भारतचे पत्रकार देवलाल पाटील यांची कन्या रुपाली व अंजनसोंडे (ता.भुसावळ) येथील कै.छगन तुळशीराम पाटील यांचे सुपूद्ध सचिन यांचा शुभविवाह वर-वधू पक्षाकडील मंडळींनी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत उरकून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व नुकताच सोशल डिस्टन्स पाळून कोणताही गाजावाजा न करता हा विवाह सोहळा पार पडला. या निर्णयाचे शहर व परीसरात कौतुक होत आहे.
तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे पारंपरिक लग्नसोहळ्याला फाटा देऊन आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन अत्यंत साध्या पद्धतीने कोळी समाजातील वधू-वरांच्या विवाह सोहळा झाला. यावेळी मोजक्याच लोकांची उपस्थितीसह फिजिकल डिस्टन्िंसग ठेवण्यात आला होेता. याप्रसंगी नवरदेवाचे वडील सुभाष गजमल वाकडे यांच्यातर्फे कर्मचारी संघटनेच्या शहादा येथे प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामास पाच हजार रुपये व पुरूषोत्तमनगर येथील विठ्ठल मंदिरास पाच हजार रुपयांची रोख देणगी देण्यात आली. यावेळी अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या विवाह सोहळ्याला लागणार्या खर्चाची बचत झाल्याने ते पैसे वधू-वरांच्या बँक खात्यात डिपॉझिट करून बचत करण्यात आली. येथील सुभाष गजमल वाकडे यांचा द्वितीय सुपुत्र संदीप याचा विवाह हिरालाल तुळशीराम सोनवणे (रा. धुळे, ह.मु.नंदुरबार) यांची सुकन्या चि.सौ.कां. आश्विनी हिच्याशी 2 मे रोजी पुरुषोत्तम नगर येथे मोजक्याच लोकांच्या साक्षीने पार पडला. यावेळी सुरेश जाधव यांनी सर्वप्रथम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाची काळजीबाबत उपस्थितांना माहिती दिली. नियोजित वर-वधुच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजातील लग्नाच्या तारखा पुढे न ढकलता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विवाह लावावेत, असे आवाहन करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App