व्हायरस विरुद्धच्या लढाईत धर्मांधता सहन केली जाणार नाही : उपराष्ट्रपती

कोणाच्या अंधश्रद्धा आणि धर्मांधता यामुळे चीनी व्हायरस विरुद्धच्या लढाईत अडथळे येणार असतील तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. सामाजिक अंतराचे निकष पाळायलाच हवेत. तोपर्यंत मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असे आवाहन त्यांनी केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोणाच्या अंधश्रद्धा आणि धर्मांधता यामुळे चीनी व्हायरस विरुद्धच्या लढाईत अडथळे येणार असतील तर ते सहन केले जाणार नाही असा इशारा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिला आहे. सामाजिक अंतराचे निकष पाळायलाच हवेत. तोपर्यंत मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करू नयेत असे आवाहन त्यांनी केले.

फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, चुकीच्या माहितीचा व्हायरस त्वरित तपासा. त्याला पसरू देऊ नका. सर्व धार्मिक गटांनी हे समजून घेतले पाहिजे की सामाजिक अंतराचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

चीनी व्हायरस विरुद्धच्या लढाईत वैद्यकीय सेवकांचे योगदान खूप मोठे आहे. फ्रंट-लाइन वॉरियर्सची सुरक्षा आणि काळजी घेणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा आणि कोणी ऐकत नसेल म्हणून चीनी व्हायरस विरुद्धचा आपला लढा कमकुवत करण्यास परवानगी देऊ शकत नाही. सावधगिरी बाळगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.अफवा आणि चुकीची माहिती कमी करण्यासाठी सत्य सर्वांपर्यंत पोहोचवले पाहिजे. अपुरी किंवा सदोष माहिती आणि समज असतील तर व्हायरस विरूद्ध युद्ध जिंकले जाऊ शकत नाही.

काही राज्यांमध्ये जास्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नुकत्याच नवी दिल्लीतील उदाहरणावरून काही मंडळी बेजबाबदारपणे वागत आहेत, असे दिसून आले आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. विषाणूमुळे जाती, धर्म, वर्ग, भाषा, प्रांत पाहत नाही. त्यामुळे या लढ्यात सर्व धर्माचा सामाजिक प्रतिसाद आवश्यक आहेत. सर्व धार्मिक गटांनी एकत्रितपणे मुकाबला करायला हवा. मला आशा आहे की यापुढे दिल्लीसारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत. नियमाचे उघड उल्लंघन होणार नाही

सर्व राज्य सरकारे, नागरी संस्था आणि खासगी क्षेत्राद्वारे घेत असलेल्या विविध उपायांचे उपराष्ट्रपती यांनी कौतुक केले.
विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत. गोरगरीब लोकांचे कष्ट स्थलांतरित कामगार यांना मदत केली जात आहे. “ही विश्रांती घेण्याची वेळ नाही आणि कठीण संघर्ष आहे. जागरूक रहा आणि एकत्र या धोक्याशी लढा,” असे उपराष्ट्रपती म्हणाले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात