समाजकल्याण मंत्री विजय वडेट्टीवार जनतेचे सोडून कोणाचे कल्याण करत आहेत, असा आरोप आता कॉँग्रेसमधूनच होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविण्यासाठीचा निधी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी खर्च करण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेसचे माजी खासदार नरेश पुंगलिया यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे.
विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री विजय वडेट्टीवार जनतेचे सोडून कोणाचे कल्याण करत आहेत असा आरोप आता कॉंग्रेसमधूनच होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरविण्यासाठीचा निधी रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेसचे माजी खासदार नरेश पुंगलिया यांनी त्यांना घरचा आहेर दिला आहे. वडेट्टीवार गोरगरीब जनतेची थट्टा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार हे शिवसेनेमधून नारायण राणे यांच्यासोबत कॉंग्रेसमध्ये आले होते. मात्र, नंतर त्यांनी राणेंची साथ सोडली आणि कॉंग्रेसमध्येच बस्तान बसविले. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी त्यांना स्वीकारले नाही. चीनी व्हायरसच्या संकटात चंद्रपूरमधील गोरगरीब दोन लाखांवर कुटुंबांना अन्नधान्य पुरविण्यासाठी ११ कोटींचा निधी खर्च करण्याची घोषणा वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, हे पुरवठ्याचे कंत्राट रद्द करून त्यांनी नवीन ३७ रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेतला आहे. यावरून पुंगलिया यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी सर्वाधिक ३८ कोटींच्या निधीचे नियोजन केल्याचा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दावा खोटा असल्याचे पुंगलिया यांनी म्हटले आहे. ज्या मदत व पुनर्वसन खात्याचे वडेट्टीवार मंत्री आहेत त्या खात्याकडून आजवर केवळ तीन कोटी रुपये मिळाले आहेत, असे म्हणत त्यांनी वडेट्टीवारांचे अपयश अधोरेखित केले आहे.
खनिज निधी आणि आमदार, खासदार निधी ठरवून दिलेल्या कामासाठीच वापरता येतो. परंतु, चीनी व्हायरस संकटासारख्या सारख्या अपवादात्मक परिस्थितीत या पैशाचा उपयोग होत असेल तर करावा. कारण पालकमंत्री आपल्या मदत व पुनर्वसन खात्यातून केवळ तीन कोटी रुपये आणू शकले. याचा अर्थ ते कोरोनाशी लढण्यासाठी पैसे आणण्यात अपयशी ठरले. आता ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यावर पांघरूण टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पुगलिया यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App