देशातील उद्योगाचे चक्र फिरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. चीनी व्हायरसच्या संकटातून सावरण्यासाठी देशात २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातून लघुउद्योगांना सहज कर्ज मिळणार आहे. त्यासाठी सरकार आर्थिक कर्ज देणाऱ्या संस्थांचा शोध घेत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील उद्योगाचे चक्र फिरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत. चीनी व्हायरसच्या संकटातून सावरण्यासाठी देशात २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यातून लघुउद्योगांना सहज कर्ज मिळणार आहे.
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, लघु उद्योगांना आर्थिक पाठबळाची मदत करण्यासाठी सरकार नवीन आर्थिक कर्ज देणाऱ्या संस्थांचा शोध घेत आहे. सरकार एनबीएफसींना अर्थात बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना बळकटी देण्याच्या दिशेने काम करीत आहे.
ज्यामुळे आगामी काळात छोट्या व्यवसायांना सहज कर्ज मिळण्यास मदत होईल. एमएसएमईवर कोविड- 19 चा परिणाम आणि त्यापुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांविषयी ते कोलकाता चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.
सध्या अतिथ्य व्यवसाय (हॉस्पिटॅलिटी) मोठ्या कठीण काळातून जात आहे. या व्यवसाय क्षेत्रावर महामारी आणि टाळेबंदीचा मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल्स तसेच इतर निवारा केंद्रांसाठी मंजुरी किंवा प्रमाणपत्राची वैधतेची मुदत टाळेंबदीच्या कालावधीत संपत असल्यास 30 जून 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App