राहुल सर… हा बघा लॉकडाऊनमुळे झालेला फायदा !

अद्ययावत वैद्यकीय सुविधा, भक्कम आर्थिक स्थिती, मर्यादीत लोकसंख्या असे असूनही इटली, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड सारख्या प्रगत देशांमध्ये चिनी विषाणूने शेकडो बळी घेतले. मात्र 130 कोटींचा भारत अजूनही चिनी विषाणूविरोधात दमदार लढाई लढतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळीच उचलेली पावले आणि लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय यामुळे हे शक्य होत आहे. मात्र या लॉकडाऊनवरच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शंका उपस्थित केली. त्याला काय मिळाले उत्तर?


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी गुरूवारी लॉकडाऊनच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यावर सातत्याने ते टीकाही करत आहेत. मात्र, आकडेवारीनेच त्यांना उत्तर दिले आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्हायरसचा फैलाव घटला. रुग्णांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

एवढेच नव्हे तर लॉकडाऊनची घोषणा वेळीच झाली नसती तर एव्हाना भारतात सात लाखांपर्यंत मृत्यू केवळ कोरोनामुळे झाले असते, असेही तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १५ ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे तरीही करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येते आहे.

लॉकडाऊनच्या आधी कोविड-19च्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी दर 3 दिवस होता. गेल्या सात दिवसांत, हा दुप्पट होण्याचा दर 6.2 दिवस इतका झाला आहे. 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात दुपटीचा दर देशाच्या सरासरी दरापेक्षा कमी आहे.
1 एप्रिलपासून रुग्णाच्या सरासरी वाढीचे प्रमाण 1.2 आहे तर मार्च 15 ते मार्च 31 या दरम्यान सरासरी वाढीचे प्रमाण 2.1 होते. रुग्णांच्या प्रमाणात झालेली ही 40 टक्के घट कोविड चाचण्यांमध्ये वाढ केल्यामुळे झाली आहे.

कोविड-19 च्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणि रुग्णांचा मृत्यू याच्या गुणोत्तराच्या संदर्भात भारत इतर अनेक देशांपेक्षा अधिक चांगले काम करत आहे. हे गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 5 लाख जलद टेस्टिंग किटसचे वितरण जी राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण खूप जास्त आहे तिथे करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले .

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात