विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विनंतीनंतर पंतप्रधान मोदी आज सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह गुजरात आणि इतर सहा ते सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत, असा अजब दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
वास्तविक पंतप्रधान – मुख्यमंत्री संवाद पूर्वनियोजित आहे आणि असतो. हे पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना समजत नसेल काय? समजते पण पंतप्रधानांपेक्षा पवार मोठे नेते आहेत हे सांगण्याची खुमखुमी जात नाही ना…!!
जणू पवारांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले नसते तर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी संवादच साधला नसता…!!
वास्तविक पंतप्रधानांचा हा संवाद सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आहे. फक्त महाराष्ट्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी नाही. मात्र राष्ट्वादी selective narration सादर केले आहे. या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील श्रमिकांची घरवापसी, लॉकडाउनबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. हे सांगायला राष्ट्रवादी किंवा पवार कशाला हवेत? तसे निर्णय घेण्यासाठीच पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद होत आहे आणि हा काही पहिला संवाद नाही. चौथा संवाद आहे. राष्ट्रवादीने उपटसूंभासारखे बोलण्यासारखे यात काहीही नाही.
देशभरातील स्थलांतरित श्रमिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी मदतीची याचना करीत असून, ऐन उन्हाळ्यात पायी पायी जाणाऱ्या मजुरांच्या भीषण परिस्थितीकडे शरद पवार यांनी पंतप्रधानांचे ट्विटद्वारे लक्ष वेधले होते. काही राज्यांनी या श्रमिकांना स्वीकारण्यास दिलेला नकारामुळे राज्या-राज्यांमध्ये तणाव निर्माण होत असून, याबाबत केंद्राची भूमिका संदिग्ध असल्याचाही दावा राष्ट्रवादीने केला आहे. हा दावाही तथ्यहीन आहे. केंद्र स्तरावरून राज्य स्तरावर सातत्याने संपर्क, संवाद, मदत, समन्वय हे घडते आहे.
आपत्कालीन परिस्थितीतील शरद पवार यांचा अनुभव मोठा आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील विसंवादामुळे निर्माण होऊ घातलेले संकट शरद पवार यांनी देशातील ज्येष्ठ राजकीय व्यक्ती म्हणून केलेल्या एका विनंतीवजा सूचनेमुळे दूर होण्यास मदत होणार आहे, असा “उच्च कोटीतील” दावाही लोकसभेत ५ खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीने केला आहे…!! राजकीय औकातीपेक्षा एखाद्याला जास्त महत्त्व दिले की असे होते…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App