कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर बोलण्ें झाले. त्यांना काही सूचना देखील केल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका टाळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिवसेंदिवस विविध नवीन निर्णय घेत आहे. उद्धव ठाकरेंच्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल फोनवर बोलण्ें झाले. त्यांना काही सूचना देखील केल्या आहेत. राज ठाकरे म्हणतात. उपाययोजना करायला थोडा उशीर झालाय पण सरकारनं योग्य पावले उचलली आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार राज्यात रोखण्यासाठी माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय. करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पण आता पुढे जाऊन देशांतर्गत विमान वाहतूकही थांबवायला हवी, अशी सूचना आपण मुख्यमंत्र्यांना केली, असेही त्यांनी म्हटले. कराज ठाकरेंनी सरकारी कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचं अभिनंदनही केलं. सरकारला उपाययोजना करायला थोडा उशीर झाला आहे, मात्र सरकारनं योग्य पावलं उचलल्याचं राज ठाकरे म्हटलं आहे.
कोरोना व्हायरस देशात जास्त पसरला तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे आहे का? असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला. काही मुठभर लोकांना परिस्थिचीचं गंभीर्य कळत नाही. कालच बंद झाला, तो भारत बंद नव्हता, ती एक टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही, तर सरकारला गंभीर आणि कडक पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरेंनी म्हटलं. सरकारकडून नागरिकांना घरी थांबण्याचं आवाहन करुनही दुसºया दिवशी वाहनं रस्त्यावर आली, चेकनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. असं का करताय असा सवाल राज ठाकरेंनी लोकांना विचारला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन नागरिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केले आहे. आतापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही असे राज ठाकरेंनी सांगितलं आहे. सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या, असेही राज म्हणाले होते. आत्तापर्यंत आपण कोरोनाला जास्त फैलावू न देण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोना एकमेकांच्या सहवासातून होतो. म्हणून आपण जर कमी वेळा एकमेकांच्या जवळ गेलो आणि हे सुमारे दोन आठवडे केलं तर हा रोग पसरणार नाही. मनसे सैनिकांसाठी राज ठाकरे यांनी सूचनाही केल्या होत्या. यामध्ये ते म्हणतात. आपण ज्या भागात रहातो तिथे लोक गोंधळलेल्या अवस्थेत असू शकतात. तिथे त्यांना दिलासा द्यायला पाहिजे. तिथे माहितीची कमी असेल, साधन-सोयींची कमतरता असेल तर योग्य ते करावे. आपल्या शाखा-शाखांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये आपण एका वेळी गर्दी होणार नाही असे पहावे. ती थोडी नियंत्रित करून, काहींना वेग-वेगळ्या वेळा देऊन गर्दी आटोक्यात आणावी. आपल्यामध्ये तीन फुटांचे अंतर राखावे. आपल्या भागात जर कुणी सर्दी, तापानं आजारी असेल तर त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगावे. त्यासाठी कुठलीही जोर-जबरदस्ती करू नये. त्यांचं मन तयार करावं आणि त्यांना आपल्या भागातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी वगार्शी भेट घालून द्यावी. आपल्या भागात असे कुणी रूग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याच्या योग्य व्यक्तिंशी संपर्क राखून त्यांच्या देखरेखीखाली त्यांचे उपचार करावेत. आपली भूमिका ही आरोग्य खात्याला सहकायार्चीच असावी. संघषार्ची नव्हे. आपल्या भागात जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा असल्यास तशी माहिती योग्य यंत्रणेला द्यावी. दुकानांमध्ये माल आहे की नाही ते पहावे. कुणी काळाबाजार करत असेल तर त्याची माहिती शासनाला द्यावी आणि लक्ष ठेवावे. ज्यांचं हातावर पोट आहे अशी माणसं आपल्या भागात असतील. ती कोण आहेत ती शोधून त्यांची खाण्याची सोय नसेल तर ती करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या भागात काही जेष्ठ नागरिक, अपंग, इतर रूग्ण असतील तर त्यांना काही मदत लागल्यास ती देण्याचा प्रयत्न करावा. महिला सेनेनी घराघरात जाऊन महिलांच्या आरोग्यविषयक किंवा काही अडचणी असतील तर त्या ऐकाव्यात. महिला सर्वसाधारणपणे बोलत नाहीत. त्यांचं ऐकावं आणि योग्य ती मदत करावी. सोशल मीडियाचा योग्य आणि कल्पक वापर करण्याची हीच ती वेळ. अफवा खोडून काढा. तुमच्या विभागातील नागरिकांशी संपर्कात राहा. शासकीय-प्रशासकीय यंत्रणेकडून येणारी योग्य माहिती जनतेपर्यंत इत्यंभूत पोहचेल ह्याची काळजी घ्या. तुम्ही तुमची, तुमच्या कुटुंबीयांची देखील काळजी घ्या. बाहेर जाताना मास्क लावा, ‘सॅनिटायझर’ने हात स्वच्छ करत रहा आणि तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना कोणताही संसर्ग होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुमचं आयुष्य हे माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी मोलाचं आहे हे विसरू नका.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App