विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटी व बदनामीकारक बातमी वेबपोर्टलवर प्रसिद्ध करून ती समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्षात तक्रार नोंदविण्यात आली आहे
राज्यपाल कोश्यारी यांनी एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन तिला महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याची असत्य व बदनामीकारक बातमी या वेबपोर्टलने प्रसिद्ध केली होती.
या बातमीला कोणताही आधार नव्हता. या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली. असत्य बातमी प्रसिद्ध करून राज्यपाल कोश्यारी यांची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
Array