विशेष प्रतिनिधी
सवाई माधोपूर : राजस्थानात सवाई माधोपूरमध्ये शाळेत क्वारंटाइनमध्ये असणाऱ्या महिलेवर तीन युवकांनी बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली.
बटोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही महिला जयपूरमध्ये भाड्याच्या घरात राहात होती. लॉकडाऊन सुरू झाल्यावर ती आपल्या गावी जायला निघाली होती पण मध्येच ती रस्ता चुकून दुसऱ्या गावात आली.
गावातील सरकारी अधिकाऱ्यांनी तिची जेवणाची व निवासाची व्यवस्था केली पण ग्रामस्थांनी ती दुसऱ्या गावातून आली आहे. तिला कोरोना असू शकतो याच्या संशयावरून तिला शाळेत एकटे राहण्यास व क्वारंटाइन मध्ये राहण्यास भाग पाडले.
ती महिला शाळेत राहू लागली. परवा रात्री तीन युवकांनी शाळेत जाऊन तिच्यावर बलात्कार केला.
महिलेने सकाळी तेथून निसटून पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी तिघांना अटक केली. महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तिची कोरोना चाचणीही घेण्यात आली आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App