विशेष प्रतिनिधी
पुणे : कोविड-१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचे संकट लक्षात घेता संपूर्ण जगात नावलौकिक असलेला पुण्याचा ऐतिहासिक आणि वैभवशाली सार्वजानिक गणेशोत्सव यंदाच्या वर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या मानाच्या गणपती मंडळाच्या व्हिडिओ काॅन्फसरींग मिटींग मधे घेण्यात आला.
यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिकविधि पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे .अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गणेशोत्सवाचे नियोजन तसेच बाप्पांच्या मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे.
आवाहन
या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहनही केले की आगामी गणेशोत्सवात कोणीही आपल्या श्री गणरायाला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App