मौलाना सादच्या शामलीतील फार्म हाऊसवर ड्रोन कँमेराने नजर

विशेष  प्रतिनिधी

नवी दिल्ली : मौलाना महंमद साद याच्या शामलीमधील फार्म हाऊसवर उत्तर प्रदेश पोलिसांनी ड्रोन कँमेराने नजर ठेवली आहे. मौलाना सादने स्वत:ला क्वारंटाइन करून ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे परंतु, तो फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे. त्याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण करण्याची नोटीस देखील बजावली आहे. मात्र तो दिल्लीतून निसटून शामली परिसरात येऊ शकतो. हे लक्षात घेऊन पोलिसांनी जाळे लावले आहे. त्याच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी ड्रोन कँमेराने नजर देखील ठेवली आहे. शामलीचे डीजी प्रवीण सिंह यांनी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठांकडून आल्याचे सांगितले. अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. परंतु, दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या भोवतीचा फास आवळत आणला असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिल्ली पोलिसांनी मौलाना सादला निजामुद्दीन परिसरातील तबलिगी मरकज मधील सर्व व्यवहारांचा तपशील कायदेशीर नोटीस पाठवून मागितला आहे. या नोटिशीत २६ प्रश्न आहेत. यात वैयक्तिक संपत्तीपासून तबलिगी जमातच्या फंडिंगपर्यंत सर्व प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्याएेवजी मौलाना साद फरार झाला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात