निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझचा प्रमुख मौलाना साद परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या निकटवर्तीयांचे पासपोर्ट जप्त केले आहेत. त्याचबरोबर तब्बल ९१६ विदेशी तबलिगींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाईही सुरू केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निजामुद्दीन येथील तबलिगी मरकझचा प्रमुख मौलाना साद परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या निकटवर्तीयांचे पासपोर्ट जप्त केले आहेत. त्याचबरोबर तब्बल ९१६ विदेशी तबलिगींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाईही सुरू केली आहे.
चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतरही दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे मोठ्या संख्येने तबलिगी जमले होते. त्यांचा प्रमुख मौलाना साद याने सोशल डिस्टन्सिंगला विरोध केला होता.
मशिदीच्या पवित्र वातावरणात व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकणार नाही, अशी मुक्ताफळे उधळली होती. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुढाकार घेऊन सर्व तबलिगींना बाहेर काढले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विदेशी नागरिकही होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा हा कालावधी संपल्यामुळे पोलीसांनी त्यांची चौकशी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मौलाना साद याच्या सांगण्यानुसारच २० मार्चनंतरही चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला असतानाही ते मरकझमध्ये थांबले होते. त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे.
पोलीसांनी मौलानाच्या तीन निकटवर्तीयांचे पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलीसांनी मौलानाचा विश्वासू मानला जाणार्या मोहम्मद सईद याच्यासह तीन जणांचे पासपोर्ट जप्त केले आहेत. त्याच्यासह मौलाना पळून जाण्याची भीती असल्याने पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App