मोदी सरकार – २ च्या वर्षापूर्तीनिमित्त भाजप पोहोचणार १० कोटी घरांपर्यंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्याची वर्षापूर्ती ३० मे रोजी होत आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळात कोणताही जाहीर कार्यक्रम करणे शक्य नसल्याने भाजपा मोदी सरकारचे काम व्हर्च्युअल संवादातून १० कोटी घरांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्याची वर्षापूर्ती ३० मे रोजी होत आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळात कोणताही जाहीर कार्यक्रम करणे शक्य नसल्याने भाजपा मोदी सरकारचे काम व्हर्च्युअल संवादातून १० कोटी घरांपर्यंत पोहोचविले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३० मे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा सरकार स्थापन झाले. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून मोदी सरकारला चीनी व्हायरसविरुध्दच्या लढाईतच गुंतून पडावे लागले आहे. या काळात भारतीय जनता पक्षाच्या संघटनेने अतुलनिय काम केले आहे. संकटाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये यासाठी भाजपाच्या संघटनेने तब्बल ४ कोटी लोकांना रेशनकिट वाटले. कोट्यवधी मास्क वाटण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस भूपेंद्र यादव यांनी सांगितले की भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून १९ कोटी लोकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोहोचविण्यात आली. आरोग्य सेतू अ‍ॅपच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. हे काम लोकांपर्यंत पोहोचवितानाच चीनी व्हायरसविरुध्दची लढाई आणखी मजबूत करण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आत्तापर्यंत १५० हून अधिक व्हिडीओ कॉन्फरन्स केल्या आहेत. यामध्ये लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत पोहोचविण्याचे आवाहन नड्डा यांनी केले आहे.

वर्षापूर्तीनिमित्त स्वत: नड्डा जिल्हा पातळीवरील कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर व्हर्च्युअल रॅलीही काढल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम एक महिन्यांपर्यंत चालणार आहे. यामध्ये चीनी व्हायरस संकटात केलेल्या मदतीबरोबरच दहशतवादाला दिलेले चोख उत्तर, काश्मीरमधील ३७० कलम हटविणे यासारखे मुद्देही जनतेसमोर मांडले जाणार आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात