मोदी यांच्या आवाहनावरुन युवा रोहित पवार विरुद्ध प्रौढ आव्हाड आमने सामने; शरद पवार कोणाचं ऐकणार नातवाच की मानस पुत्राच,?

तरुणाईची भाषा आणि मन जाणण्यासाठी ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी येत्या 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे दिवे व मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन केले. कोणत्याही संकटा विरोधात देशाच्या सामुहिक ताकदीचे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी देशाला प्रेरित केले. त्याला सोशल मीडियातून तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळू लागला आहे. सध्याच्या निराशेच्या वातावरणात या प्रतिकात्मकतेचे महत्व जाणणार्‍या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा आमदार रोहित पवारही या तरुणाईत आहेत. मात्र, त्यांच्याच ‘राष्ट्रवादी’च्या जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक यांच्यासारख्या प्रौढ नेत्यांना मात्र तरुणाईची ही पॉझिटीव्ह भाषा समजलेली नाही. यामुळे ‘राष्ट्रवादी’ युवा आणि प्रौढ नेत्यांमधल्या मतभेदाचे दर्शन घडले आहे


विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी सामूहिक शक्तीचे दर्शन घडविण्यासाठी दिवे व मेणबत्ती पेटविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सध्याच्या निराशेच्या वातावरणात यातील प्रतिकात्मकतेचे महत्व समजणार्‍यांनी याचे स्वागत केले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवा आमदार रोहित पवारही आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड, नबाब मलिक यांच्यासारख्या कट्टर मोदीद्वेष्टया नेत्यांनी यावरून टीका केली आहे. मात्र, यामुळे राष्ट्रवादीत आव्हाड विरुध्द रोहित पवार असे गटही पडले आहे.

शुक्रवारी सकाळी पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला. १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असे आवाहन केले.

आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून पंतप्रधांनाच्या एकतेच्या संदेशाला पाठिंबा दिला. ते म्हणतात, दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करु, असं देशाचा नागरिक म्हणून मी आवाहन करतो. पवार यांनी हे स्वागत करण्यामागे त्यांचे आजोबा शरद पवार यांची शिकवण आहे.

२२ मार्च रोजी जनता कर्फ्यूच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला शरद पवार यांनी प्रतिसाद दिला होता. कोरोनाविरुध्द लढणार्यांच्या शौर्याचा सायंकाळी पाच वाजता टाळ्या वाजवून सन्मान करा, असे मोदी म्हणाले होते. या वेळी पवार यांनी नातीसह घराच्या दारात येऊन टाळ्या वाजविल्या होत्या. त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअरही केल होता.

प्रामाणिक प्रयत्नांना आणि देशवासियांची उमेद वाढविण्याच्या उपक्रमांना शरद पवार पाठिंबा देतात हे माहित असल्याने रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या दिव्याच्या आवाहनाचे स्वागत केले. मात्र, राष्ट्रवादीचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ही शिकवण घेतली नाही. ‘म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका. आम्ही घरातील लाईट चालूच ठेवणार असे आव्हाड यांनी म्हटले आहे.अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही या उपक्रमावर टीका करणारे ट्विट केलेआहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या भाषणानं देशवासीयांची निराशा केली आहे. आम्हाला वाटलं होतं पंतप्रधान चुली पेटवण्याचा संदेश देतील पण साहेब दिवे जाळण्याचा उपदेश देऊन गेले,’ अशी टीका मलिक यांनी केलीआहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मोदींच्या आवाहनावर टीका करतानाम्हटले आहे, ‘थाळी-टाळीनंतर आता दिवे जाळण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं मोदींनी हे प्रसिद्धीचे स्टंट बंद करून काहीतरी ठोस पावलं उचलावीत.

पंतप्रधानांच्य कोणत्याही कृतीवर टीका करणार्या आपल्याच पक्षातील नेत्यांना शरद पवार यांनी टाळ्या वाजवून चपराक हाणली होती. आताही पंतप्रधांच्या आवाहनाला पाठिंबा देऊन शरद पवारच दिवे लावतील. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तोंड लपविण्याची वेळ येईल, अशी टीकाही सोशल मीडियातून होत आहे. मात्र, या निमित्ताने सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असलेले राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार एकमेंकासमोर उभे ठाकल्याचे दिसत आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात