शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता मित्रपक्ष कॉंग्रेसनेच हल्लाबोल केला आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळातही अधिकारी आपला स्वार्थ साधत आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसच्या गटनेत्यांनी करत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसनेच हल्लाबोल केला आहे. चीनी व्हायरसच्या संकटकाळातही अधिकारी आपला स्वार्थ साधत आहेत, असा थेट आरोप कॉंग्रेसचे गटनेत्यांनी केला आहे. गटनेत्यांनी याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
मुंबई महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते रवी राजा यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये अधिकारी या संकटाच्या काळातही आपला स्वार्थ साधत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा स्वार्थ नक्की कसा साधत आहेत हे त्यांनी स्पष्ट केले नसले तरी चीनी व्हायरसच्या संकटकाळात आलेली मदत परस्पर हडप केली जात असल्याची शक्यता आहे. यामुळेच कॉँग्रेसने शिवसेनेवर टीका केली आहे.
वैधानिक मान्यता असलेल्याा गटनेत्यांच्या सूचनांचा आदर केला जात नाही. त्यांना कोणत्याही प्रकारे सामावून घेतले जात नाही. त्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. मी या पत्रात खूप जबाबदारीने मांडतो आहे की कोवीड-१९ च्या उपाययोजनांच्या नियोजनात नेमलेले अधिकारी स्वार्थ साधत आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी संपाचा इशारा दिला होता. त्यामध्येही सहभागी होणार असल्याचे कॉंग्रेसने सांगितले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेत कॉँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वाद उघड झाले होते. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम करत असलेले प्रवीणसिंह परदेशी यांची ऐन संकटाच्या काळात राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली होती. त्यांच्या जागी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राज्य शासनाचे अपयश परदेशी यांच्या माथ्यावर मारण्यात आले होते. परदेशी हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने शिवसेनेच्या या निर्णयावर सर्वपक्षीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आघाडी सरकारने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मात्र, या अधिकाऱ्यांवरच आता कॉंग्रेसने थेटच हल्लाबोल केल्याने मुंबईतील परिस्थिती हाताळण्यास सरकारला पूर्ण अपयश आल्याचे दिसून येत आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App