पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या महिला केंद्रीत योजना राबवितानाच ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात या महिला कार्यकर्त्या सामाजिक योध्याची भूमिका बजावत आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यासारख्या महिला केंद्रीत योजना राबवितानाच ग्रामीण भागात महिला कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात या महिला कार्यकर्त्या सामाजिक योध्याची भूमिका बजावत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून ग्रामविकास मंत्रालयाने स्वयंसहाय्यता गटांना बळकट करण्याची योजनाआखली होती. यामध्ये 10 ते 20 महिलांचे गट तयार करण्यात आले होते. या गटाला १० हजार रुपये फिरता निधी दिला गेला. प्रति गट रु.10,000/- प्रमाणे फिरता निधी असेल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत नियुक्त केलेल्या विविध यंत्रणेमार्फत अंगणवाडी सेविका, आशा आदी मार्फत या गटांची स्थापना करण्यात येईल वस्ती स्तरावर 10 ते 20 स्वंय सहाय्य गटांचे मिळुन एक वस्ती स्तर संघ स्थापन करण्यात आले. वस्ती स्तर संघाच्या अभियांना अंतर्गत विकासासाठी ५० हजार रुपयांचा निधी देण्यता आला होता. या माध्यमातून देशभरातील 63 लाख स्वयं सहायता गट तयार करण्यात आले होत. या गटांमध्ये तब्बल ६ कोटी ९० लाख महिला सदस्य काम करत आहेत.
या सदस्यांच्या माध्यमातूनच लॉकडाऊनच्या काळातही, बँक नसलेल्या क्षेत्रातही बीसी पॉईंटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घरपोच बँकिंग सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक-आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणारे हे नागरिकांना दिलासा मिळत आहे. सरकारने ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या वित्तीय पॅकेजेस संदभार्तील माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने बीसी सखी काम करीत आहेत. त्यांच्याच माध्यमातून कोवीड 19 प्रादुर्भाव काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री किसान तसेच मनरेगा योजनेअंतर्गत केलेल्या वित्तीय तरतूदी बहुसंख्य लाभार्थींपर्यंत पोहोचत आहेत. बीसी सखींनी या परिस्थितीत आपल्या कर्तव्याप्रती असाधारण बांधिलकीचा प्रत्यय देत, गरीबांची उपासमार होऊ नये यासाठी त्यांना मूलभूत बँकिंग सेवा घरपोच प्रदान होईल, याची खातरजमा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App