विशेष प्रतिनिधी
- रवींद्रनाथांचा बंगाल ते ममतांचा बंगाल प्रवास
- संपूर्ण देश एकजूट होऊन कोरोनाशी लढत असताना ममतांच्या बंगालमध्ये चाललंय काय?
- ममता सरकारचे कोरोनाग्रस्तांचा आकडा लपविण्याचे प्रकार केंद्रीय समितीसमोरच उघडे पडले असतानाच हावडा, २४ परगणा, कोलकाता शहर, जिल्ह्यांमध्ये मृतदेहांची गुप्तपणे विल्हेवाट लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ममता सरकार या आकड्यांबाबतही मूग गिळून गप्प आहे.
- शांती मार्चच्या नावाखाली हावड्यात लॉकडाऊन तोडून मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ममतांच्या तृणमूळ काँग्रेस कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्ते सामील झाले होते.
- बंगालचा प्रवास “रवींद्रनाथांचा बंगाल ते ममतांचा बंगालपर्यंत” झाल्याचा एक धक्कादायक प्रकार रवींद्र भारती विद्यापीठातून समोर आला. रवींद्रनाथांच्या स्फूर्तिदायक काव्याचे अश्लील विडंबन विद्यार्थिनींनी पाठीवर विविध रंगात कोरून वसंत उत्सवात सामील झाल्या. रवींद्रनाथांच्या काव्यातील प्रतिमांचा मानवी अवयवांशी संबंध जोडून द्वैअर्थी अश्लील काव्यपंक्ती काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पाठीवर आणि छातीवर कोरल्या. रवींद्रनाथ प्रेमींनी सोशल मीडियावर त्याबद्दल आवाज उठविल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी, विद्यार्थिनींना माफी मागायला लावली. पण सरकारने अद्याप कोणाला अटक केलेली नाही. प्रस्थापितांविरोधात बंडखोरी करण्याच्या नावाखाली सगळा उपद्वव्याप करणारा मात्र पळून गेला आहे.