विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातला तेलिनपारा येथला हिंदू विरोधी हिंसाचारामागे खूप मोठे कारस्थान आहे. ममता बँनर्जींना इस्लामिक पश्चिम बांगलादेश निर्माण करायचाय, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री आणि रायगंजच्या भाजप खासदार देवश्री चौधरी यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममतांनी जिहादी, रोहिंग्या आणि बांगलादेशींना अतिरिक्त महत्त्व दिले आहे. पश्चिम बंगालमधल्या गावागावांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये याच घटकांनी शिरकाव केला आहे. या अर्थाने बंगाल इस्लामी डायनामाइटवर उभा आहे, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असेही चौधरी यांनी म्हटले आहे.
तेलिनपारा येथे हिंदू वस्त्या कोरोनाच्या रेड झोनमध्ये येत नाही याचे निमित्त करून जिहादी, रोहिंग्यांनी या वस्त्यांवर हल्ले केले. तेथील हिंदूंना घरे, वस्त्या रिकाम्या करायला लावल्या. हा हिंसाचार चालू असताना पोलिस त्याकडे दुर्लक्ष करत होते. हुगळीच्या भाजप खासदार लॉकेट चटर्जी यांना तेथे जाऊ दिले नाही. या घटना अत्यंत गंभीर आहेत. या पार्श्वभूमीवर देवश्री चौधरी यांनी केलेल्या आरोपांना महत्त्व आहे.
बंगालमधील कोरोनाचे आकडे ममता सरकार लपवत असल्याच्या आरोपाचाही चौधरी यांनी पुनरूच्चार केला.
Array