चीनी व्हायरसविरुध्दच्या संकटात सामान्यांना मदतीसाठी भारतीय जनता पक्षाने कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तो ‘कोविड हेल्पलाईन’ची सुरुवात करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरसविरुध्दच्या संकटात सामान्यांना मदतीसाठी भारतीय जनता पक्षाने कोविड हेल्पलाईन सुरू केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तो ‘कोविड हेल्पलाईन’ची सुरुवात करण्यात आली.
मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होती. हेल्पलाईनमुळे लोकांना कोरोना संकटाच्या ह्या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये मदत मिळेल. महानगरपालिकेद्वारे अधिकृत केलेले कोविड डॉक्टर, क्वारंटाईन सेंटर्स, कोरोनासाठी आरक्षित रुग्णालये, बिगर कोविड रुग्णालय,
बिगर कोविड सामान्य क्लिनिक, पोलिस स्थानक, रेशन दुकान, मंत्रालय नियंत्रण कक्ष, वार्ड कंट्रोल रूम, आरोग्य अधिकारी व रुग्णवाहिकेशी संबंधित मदत, सुविधा व सेवांच्या संदर्भात आवश्यक माहिती ह्या हेल्पलाईनद्वारे घेता येऊ शकते.
फडणवीस म्हणाले की, ‘कोरोना संकटाच्या काळात ही अतिशय उपयोगी हेल्पलाईन ठरेल व त्याद्वारे सामान्य व्यक्तींना कोरोना संकटामध्ये आपल्या आवश्यक सुविधा प्राप्त करण्यासाठी सहजपणे संपर्क करता येईल. अशा प्रकारची हेल्पलाईन मुंबईतील प्रत्येक भागासाठी बनवली जावी ज्यामुळे सामान्य जनतेला आपल्या गरजेच्या वेळी संपर्क करताना कोणतीही अडचण येणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App