अमेरिकेतील ‘व्हाइट हाऊस’ हे तेथील राष्ट्राध्यक्ष यांचे कार्यालय म्हणून काम पाहते. जगातील सर्वांत जास्त शक्तिशाली असे प्रशासकीय कार्यालय समजले जाते. व्हाइट हाऊसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पीएमओ ऑफिस आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियाचे ऑफीस यांना फॉलो करण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी जगातील एकमेव राजकीय व्यक्ती आहेत, ज्यांना हा बहुमान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अमेरिकेशी भारताचे संबंध खूप चांगले झाले. चिनी व्हायरसच्या संकटात ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्लोरोक्वाईन औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली होती. मानवतेच्या धर्माला जागून मोदी यांनी या औषधावरील निर्यातीची बंदी उठविली. त्यामुळे भारत अमेरिका संबंधात नवे पर्व सुरू झाले आहे. त्याचाच भाग म्हणून चिनी व्हायरस विरुद्धच्या लढाईत एकत्रित येऊन काम करण्यासाठी व्हाइट हाऊसने मोदी यांना फॉलो करणे सुरू केले आहे.
