विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करावी, असा आदेश भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने गुरुवारी (ता. २६) घेतला.
भाजपाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची ऑडिओ ब्रिजद्वारे आज बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक या ऑडिओ ब्रीजला उपस्थित होते. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपातकालिन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेचा आढावा आणि आणखी सुधारणा करण्याची चर्चा यावेळी झाली. येत्या काळात कोअर कमिटी, राज्यातील सर्व खासदार, आमदार, महापौर आणि नगराध्यक्ष यांच्याही व्हीडिओ-ऑडिओ बैठका घेतल्या जाणार आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या काळात प्रत्येक गरिब आणि गरजूंना मदत मिळाली पाहिजे. राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. या सेवा कार्यास पोलिसांकडून परवानगी आहे मात्र गर्दी न होऊ देता आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊनच हे काम करावे लागेल. प्रत्येक जिल्ह्यात भाजपाची एक हेल्पलाईन सुद्धा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ परिवार दत्तक घेऊन त्यांना मदत करावी. या माध्यमातून देशभरातील १०५ कोटी लोकांपर्यत आपण पोहोचणार आहोत. ज्या व्यवस्था होत नाहीत, त्या आपण भाजपा म्हणून करायच्या, हाच आपल्या कामाचा ‘मूड’ आणि ‘मोड’ असला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांना आदेश
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App