भाजपकडून 13 लाख फूड पाकिटाचे वाटप; 550 कम्युनिटी किचन सुरू

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाग्रस्तांची संख्या जेथे सर्वाधिक आहे, अशा महानगर क्षेत्रातील नगरसेवकांशी आज माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या आणि आणखी काय उपाय केले पाहिजे, याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

राज्याच्या सर्व महापालिकांमधील भाजपा नगरसेवक या संवादसेतूमध्ये जोडले गेले होते. प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अन्य नेते यात सहभागी झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा मुंबई, एमएमआर, पुणे, नागपूर अशा सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे या समस्येला तोंड देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये महापालिकेतील नगरसेवकांचा वाटा फार मोठा असणार आहे. आपण भाजपा म्हणून सेवाकार्य करीत असताना स्वत: सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे कठोरतेने पालन करीत, कुठेही गर्दी न करता हे सेवाकार्य करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात कुणीही अन्नापासून वंचित राहणार नाही, प्रत्येक गरजूला वैद्यकीय सुविधा प्राप्त होतील आणि आपला परिसर सर्व नियमांचे पालन करीत स्वच्छ कसा राहील, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे.

या संवादादरम्यान, अनेक शहरांमध्ये रेशनदुकानांबाबतच्या समस्या नगरसेवकांनी मांडल्या. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, रेशन दुकानातून धान्य मिळण्याबाबत दोन स्वतंत्र आदेशांमुळे जो परिणाम नागरिकांना भोगावा लागतो आहे तसेच स्थलांतरित तसेच इतरही कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. त्यावर राज्य सरकार उपाय करते आहे. विविध रूग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स आणि अन्य सुविधांबाबत सुद्धा यावेळी नगरसेवकांनी मते मांडली.

_____________________________________________________________________________________________________________________________
आतापर्यंत भाजपाचे सेवाकार्य :
मंडलांमध्ये काम सुरू : 587
कम्युनिटी किचन   : 550
तयार अन्न व धान्य वितरण : 13 लाख
फळे, भाजीपाला वितरण : 1 लाख
रक्तदान : 3500 युनिटस
सॅनिटायझेशन : 3000 नगरसेवकांकडून (महापालिका आणि नगरपालिका क्षेत्र)
ग्रामीण भागात : 4000 गावे
डॉक्टर्स आणि वैद्यकीय अधिकार्‍यांना मेडिकल किट्स : 3000

______________________________________________________________________________________________________________________________

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात