केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘सास भी कभी बहु थी’ या मालिकेने खरी ओळख मिळून दिली. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या या मालिकेतील सहकलाकारांची आस्थेने विचारपूस केली आहे. याबाबत एक भावपूर्ण व्हिडीओ त्यांनी इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांना ‘सास भी कभी बहु थी’ या मालिकेने खरी ओळख मिळून दिली. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या या मालिकेतील सहकलाकारांची आस्थेने विचारपूस केली आहे. याबाबत एक भावपूर्ण व्हिडीओ त्यांनी इन्स्ट्राग्रामवर शेअर केला आहे.
स्मृती ईराणी या आपल्या काळातील टीव्हीवरील मोठ्या स्टार होत्या. त्यांच्या अनेक मालिका गाजल्या आहेत. स्टार परिवाराशी त्यांचे विशेष नाते होते. त्यामुळे स्मृती इराणी यांनी या निमित्ताने स्टार परिवार अॅवॉर्डसचा टायटल ट्रॅक शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबर त्या म्हणतात, ते २००४ साल होते. माझा राजकारणातील प्रवेश व्हायाचा होता. त्यावेळी मला वाटायचे की माझा दुसरा परिवार दररोज रात्री साडे दहा वाजता माझ्या घरी येण्यासाठी धैर्यपूर्वक वाट पाहायचा. हा परिवार काल्पनिक होता, परंतु खूप आपला वाटायचा.
त्या पुढे म्हणतात, अनेक लोक सध्या केवळ एका फोनच्य कॉलच्या अंतरावर आहेत. लॉकडाऊनच्या काळात एखाद्या जुन्या मित्राला फोन केला की त्यालाही माझी तेवढीच आठवण येत असेल असे वाटते. स्मृती इराणी यांच्या या पोस्टनंतर त्यांच्या अनेक सहकलाकारांनी आपल्या त्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. स्मृती इराणी यांनी राजकारणात मोठे यश मिळविले तरी त्या अजूनही जुन्या सहकाºयांना विसरल्या नाहीत. त्यांना नियमितपणे भेटत असतात. सास भी कभी बहू थीच्या निर्मात्या एकता कपूर यांच्याबरोबर तर त्यांचे ऋणानुबंध अजूनही असल्याचे दिसून आले आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App