चीनी व्हायरसमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना फटका बसला आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन खातेधारकांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली आहे. मात्र, हे पैसे काढताना बॅँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी बॅँक सखी त्यांना मदत करत आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना फटका बसला आहे. त्यांच्यासाठी केंद्र सरकार प्रधानमंत्री जनधन खातेधारकांच्या खात्यात रोख रक्कम जमा केली आहे. मात्र, हे पैसे काढताना बॅँकांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी बॅँक सखी त्यांना मदत करत आहेत.
चीनी व्हायरसचा देशभरात उद्रेक झाल्यामुळे राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परिणामी अनेक लोकांना मजुरी आणि रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे. रोजंदारीवर काम करणारे मजूर, स्थलांतरित, बेघर, गरीब आणि सतत भटकत काम करणाऱ्या लोकांना या अनपेक्षित साथीचा आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसला.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत बँक खाती असणाऱ्या 20.39 कोटी महिला खातेधारकांच्या खात्यात तीन महिने, दरमहा 500 रुपये इतकी रक्कम जमा करणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका मोहिमेअंतर्गत, वित्तीय सेवा आणि बँक विभागाच्या साहाय्याने, हा निधी हस्तांतरित करण्याची जबाबदारी ग्राम विकास मंत्रालयावर सोपविण्यात आली. त्याचबरोबर सद्यस्थितीत ग्रामीण भागातील लोकांना भासत असणारी आर्थिक चणचण लक्षात घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना खात्यात 2000 रुपये आणि मनरेगा अंतर्गत देय असणारी रोजंदारीची रक्कमही थेट बँक हस्तांतरणाच्या माध्यमातून जारी केली.
थेट बँक हस्तांतरणाच्या माध्यमातून निधी जारी केल्यामुळे ही रक्कम बँक खात्यातून काढण्यासाठी बँकेच्या आवारात गर्दी होण्याची शक्यता होती. खाते क्रमांकातील शेवटच्या अंकानुसार ही रक्कम खात्यातून काढण्यासाठी कोणी आणि कशा पद्धतीने यावे, याच्या आगाऊ सूचना अनेक बँकांनी आधीच दिल्या होत्या. अशा बहुतेक प्रकरणी ग्रामीण भागातील लाभार्थींना ही रक्कम प्रदान करण्याच्या कामी बीसी सखींची म्हणजे बँकांसाठी व्यवसाय प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या स्वयंसहायता गटातील महिलांची सेवा उपयुक्त ठरत आहेत्. त्यांच्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्यासाठी कोवीड 19 लॉकडाऊन पास म्हणून अत्यावश्यक सेवेसाठीची विशेष ओळखपत्रे जारी केली. बँकांनी त्यांच्यासाठी पत्रे जारी केली तर स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी स्टीकर्स/पास जारी केले. कोवीड19 च्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हँड सॅनिटायझरचा, मास्कचा वापर करणे तसेच सामाजिक अंतर पाळणे, अशी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले.
देशभरात लॉकडाऊन सुरू असतानाही महाराष्ट्रासह आसाम, मिझोराम, सिक्कीम, मणीपूर, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू अशा सर्वच राज्यांमधून सुमारे 8 हजार 800 बीसी सखी आणि 21 हजार 600 बँक सखी, अशा दोन्ही प्रकारच्या मनुष्यबळापैकी किमान 50टक्के महिलांनी स्वत:हून काम करायला सुरूवात केली. आपल्या खात्यातील थेट बँक हस्तांतरणाद्वारे प्राप्त रक्कम काढण्यासाठी आलेल्या गदीर्चे व्यवस्थापन करण्यासाठी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना मदत करण्याबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक अंतर राखण्याबाबत जागरूक करण्याचे कामही या बँक सखी करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App