चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत लढत असतानाही पंतप्रधान मोदी ज्येष्ठांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. शुक्रवारी त्यांनी चंद्रपूरला जिल्ह्यातील मुल येथील फडणवीस वाड्यात फोन करून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शोभाताई फडणीस यंची आस्थेने विचारपूस केली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा चीनी व्हायरस मुक्त ठेवल्याबद्दल अभिनंदनही केले.
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत लढत असतानाही पंतप्रधान मोदी ज्येष्ठांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत आहेत. शुक्रवारी त्यांनी चंद्रपूरला जिल्ह्यातील मुल येथील फडणवीस वाड्यात फोन करून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री शोभाताई फडणीस यंची आस्थेने विचारपूस केली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्हा चीनी व्हायरस मुक्त ठेवल्याबद्दल अभिनंदनही केले.
शुक्रवारी सकाळी ८.४३ वाजता मूल येथे फडणवीस वाड्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन खणखणला. सकाळीच फोन खणखणल्याने कुणी आप्त स्वकीय किंवा कार्यकत्यार्चा फोन असावा असे शोभा फडणवीस यांना वाटले.
मात्र, फोन उचलल्यानंतर बोलायला सुरूवात केली तर समोरून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. विशेष म्हणजे सर्वप्रथम मोदींनी अतिशय आस्थेने शोभाताईंची चौकशी केली. वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ताईंना तुम्ही कशा आहात, प्रकृती कशी आहे? अशी विचारणा केली.
सध्या चंद्रपूर जिल्ह्याचे देशात व राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला मुख्य कारण चंद्रपूर जिल्हा चीनी व्हायरसपासून मुक्त आहे. हे यश कसे मिळविले, त्यासाठी काय केले याची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी त्यांच्याकडून जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथकाने अतिशय उत्तम कार्य केल्याची माहिती फडणवीस यांनी पंतप्रधानांना दिली. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही अधिकार्यांचे कौतुक केल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
१९८५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्रित काम केल्याची आठवण शोभा फडणवीस यांनी यावेळी सांगितली.आठवणी सांगताना अनेक किस्से सांगितले. पण या सगळ्या संकटाच्या काळात पंतप्रधान ज्येष्ठांची काळजी कशी घेतात याचे उदाहरण यातून पाहायला मिळाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App