प्रधानमंत्री किसान सन्मान आणि गरीब कल्याण योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा

  • बँकेतून पैसे काढण्यासाठी तारखा निश्चीत 
  • सब का साथ, सब का विकास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महीलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२० पर्यत तीन महीन्यासाठी प्रती माह ५०० रुपये प्रमाणे प्रत्येकी एकूण दीड हजार रुपये तातडीने जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एप्रिल महिन्याची रक्कम प्रधानमंत्री जनधन खातेधारक महीलांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली आहे.

या शिवाय, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम २ हजार रुपये थेट हस्तांतरणद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणुचा प्रसार होणार नाही याची खबरदारी म्हणून केंद्र शासनाने सर्व बँक शाखा, बँक ग्राहक सेवा केंद्र, बीसी पॉईंट, एटीएम इत्यादी ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता या योजनेची रक्कम काढण्यासाठी जनधन खाते क्रमांकाच्या शेवटचा एक अंकनिहाय तारीख ठरवून दिली आहे. त्यानुसार या बचत खात्यातून त्या त्या दिवशी किंवा ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही (सुट्टीचा वार वगळून) पैसे काढता येणार आहेत. स्वयंसहायता समुहातील महिला सदस्यांनी व इतर महिलांनी गर्दी न करता आपल्या आवश्यकतेनुसार पैसे काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. गरोदर, आजारी, अपंग व वृध्द महिलांना थेट घरपोच रक्कम अदा करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात