वृत्तसंस्था
बंगळुरू : आपल्या मुलांसोबत तलावात पोहोत असल्याचे चित्र ट्वीट केल्यावरुन कर्नाटकातील एका मंत्र्याला जनक्षोभाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेसनेही या मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. कॉंग्रेसच्या टीकेची धार जरा जास्तच आहे कारण, सध्या भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले हे महाशय पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते.
विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या मंत्रीमहोदयांना राज्याच्या कोरोना विषाणू विरोधी लढ्याच्या टीमचे सदस्य केले आहे. के. सुधाकर हे त्या मंत्र्यांचे नाव आहे. चोहोबाजूने टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलांसोबत पोहतानाचे छायाचित्र ट्वीटरवरुन डिलीट केले आहे.
तत्पुर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. शिवकुमार यांनी सुधाकर यांच्यावर “बेजबाबदार वागणूक” अशी टीका केली. शिवकुमार यांनी सोमवारी ट्वीट केले. जेव्हा संपूर्ण जग आरोग्याच्या संकटाला तोंड देत आहे, तेव्हा कोरोना प्रभारी मंत्री डॉ. सुधाकर जलतरण तलावात वेळ घालवून बेजबाबदारपणे वागणे आहे. नीती आणि मूल्यांच्या निकषांचा हा प्रश्न आहे. त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे, असे शिवकुमार यांनी ट्विट केले. आता ट्वीटरवरुन काढून टाकलेल्या पोस्टमध्ये के. सुधाकर यांनी तलावामध्ये आपल्या मुलांचा फोटो दिला होता. “बर्याच दिवसांनी माझ्या मुलांबरोबर पोहायला मिळते आहे…अर्थात इथेही सोशल डिस्टन्सिंग पाळूनच”.
के. सुधाकर हे कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री असून कोविड -19 विरुद्ध लढा देणाऱ्या राज्य सरकारच्या व्हायरस वॉर रूमचे प्रभारी होते. आता टीका झाल्यांतर त्यांची जागा राज्याचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या वर्षी कॉंग्रेस सोडणार्या बंडखोरांमध्ये के. सुधाकर होते. कुमारवामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आणण्यात त्यांची भूमिका राहिली होती. भाजपा सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी त्यांना व त्यांच्यासारख्या बंडखोरांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिले. कर्नाटकातल्या कोरोना विषाणू बाधीत लोकांची संख्या सव्वादोनशेच्या घरात गेली आहे. तर सहा जणांचे मृत्यू झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App