पीएफ अकाऊंटदारे पंतप्रधान कार्यालयाचे कंपन्यांवर लक्ष

चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात कर्मचाºयांना कामावरून कमी करू नये, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. मात्र, कंपन्यांनी हे आदेश मानले नाहीत तर त्यांच्यावर कर्मचाºयांच्या पीएफ अकाऊंटद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या संकटात कर्मचाºयांना कामावरून कमी करू नये, असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत. मात्र, कंपन्यांनी हे आदेश मानले नाहीत तर त्यांच्यावर कर्मचाºयांच्या पीएफ अकाऊंटद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे.

चीनी व्हायरसच्या उद्रेकानंतर पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सर्व व्यवहार बंद आहेत. या संकटाच्या प्रसंगी कर्मचाºयांना कामावरून काढून टाकण्याची भीती होती. मात्र, पंतप्रधानांनी त्याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कर्मचाºयाच्या पीएफद्वारेही (भविष्य निर्वाह निधी खाते) लक्ष ठेवले जात आहे.

कोणत्याही आस्थापनेत १० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्यांच्या भविष्य निर्वाह निधी मालकास भरावा लागतो. या पध्दतीने देशातील संघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाºयांची माहिती भविष्य निर्वाह निधी विभागाकडे आहे. या माध्यमातून इपीएफओकडून सर्व कर्मचाºयांना मेसेजही पाठविण्यात आला आहे.यामध्ये म्हटले आहे की, माननिय पंतप्रधानांनी सर्व आस्थापनांना विनंती केली आहे की चीनी व्हायरसच्या उद्रेकामुळे कर्मचाºयांना काम करणे शक्य नसले तरी त्यांच्या वेतनात कपात करू नये. टाळेबंदीचा निर्णय घेऊन नये. या प्रसंगी सर्वांनी एकत्रित राहून महामारीचा मुकाबला करू.

पंतप्रधानांच्या आवाहनास देशातील बहुतांश आस्थापनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोणालाही सेवेतून कमी करण्यात येणार नाही, असे आश्वासन अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या कर्मचाºयांना दिले आहे. जेपी मॉर्गन इंडिया या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, कोरोना साथीच्या काळात कोणालाही नोकरीवरून न काढण्याचा निर्णय आमच्या कंपनीने घेतला आहे. जेपी मॉर्गनचे भारतात ३४ हजार कर्मचारी आहेत.

फ्लिपकार्टनेही कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापणार नाही, तसेच कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही, असे म्हटले आहे. फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी हे आश्वासन दिले आहे. तसेच फ्लिपकार्टमध्ये इंटर्नशीप करणाºया उमेदवारांना देखील काहीही नुकसान होऊ दिले जाणार नाही, असेही फ्लिपकार्टने म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात