चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटात संपूर्ण जग लढत आहे. भारत तर आपला कट्टर दुष्मन असलेल्या पाकिस्तानला मानवतेच्या भावनेतून औषधांचा पुरवठा करत आहे. मात्र, त्या बदल्यात पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवतोय. मात्र, त्यांना चोख उत्तर देण्यास लष्कर सज्ज आहे. आठवड्यात भारतीय लष्कराने १५ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरस विरुध्दच्या संकटात संपूर्ण जग लढत आहे. भारत तर आपला कट्टर दुष्मन असलेल्या पाकिस्तानला मानवतेच्या भावनेतून औषधांचा पुरवठा करत आहे. मात्र, त्या बदल्यात पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवतोय. मात्र, त्यांना चोख उत्तर देण्यास लष्कर सज्ज आहे. आठवड्यात भारतीय लष्कराने १५ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले.
चिनी व्हायरसचा सामना संपूर्ण जग करतंय. अशा स्थितीत पाकिस्तानच्या सीमेवर कुरघोड्या सुरूच आहेत. भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यासाठी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानचा गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी नियंत्रण रेषेतून दररोज भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात भारतीय लष्कराने १५ हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती नरवणे यांनी दिली.
भारतीय लष्कर फक्त कोरोनाशी लढत नाहीए. तर नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला आणि घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. संकटात भारत शेजारी देशांना मदत करतोय. दुसरीकडे पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करतोय, असं जनरल नरवणे म्हणाले.
नियंत्रण रेषेच्या पलिकडे दहशतवाद्यांची २० ते २५ तळ आहेत. हे सर्व भारतातील हालचालींवर नजर ठेवून आहेत. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवाद्यांची तळं सक्रिय झाल्याचं जनरल नरवणे यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. यात सीमा भागात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. या पार्श्वभूमवीर जनरल नरवणे यांनी काश्मीरचा दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App